Stray Dogs esakal
जळगाव

Jalgaon News: विद्यार्थ्यावरील जीवघेण्या हल्ल्यानंतर पाचोऱ्यात मोकाट कुत्र्यांचा प्रश्‍न ऐरणीवर! समाजमन संतप्त

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, देशमुख, जामनेर, आठवडे बाजार, भडगाव रोड, राजे संभाजी चौक, महाराणा प्रताप, कैलादेवी मंदिर व कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ मोकाट जनावरांचा सतत वावर

सकाळ वृत्तसेवा

पाचोरा : येथील शहरासह शहराबाहेरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोकाट कुत्रे व जनावरांचा जीवघेणा हैदोस दिवसागणिक वाढत असून, गुरुवारी (ता. २८) दुपारी महामार्गालगतच्या संघवी कॉलनीतील दिग्वीजय पाटील या विद्यार्थ्यावर कुत्र्यांनी अक्षरशः हल्ला चढविला.

त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. यामुळे समाजमन संतप्त झाले असून, पालिका प्रशासन मात्र सुस्त आहे.(fatal attack on student issues of stray dogs in Pachora peoples angry Jalgaon News)

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, देशमुख, जामनेर, आठवडे बाजार, भडगाव रोड, राजे संभाजी चौक, महाराणा प्रताप, कैलादेवी मंदिर व कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ मोकाट जनावरांचा सतत वावर असतो.

रस्त्याच्या मधोमध मोकाट गुरे तासनतास बसून राहतात किंवा अचानक उठून रस्त्याने एकमेकांच्या मागे धावतात. यामुळे रस्त्याने चालणे व वाहनधारकांना प्रचंड त्रास व मनस्ताप सोसावा लागतो. मोकाट जनावरांच्या या प्रकारामुळे आतापर्यंत अनेक जण दुचाकीवरून पडून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

पालिकेकडे सातत्याने मोकाट गुरांचा व त्यांच्या मालकांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. मोकाट जनावरांच्या त्रासामुळे विद्यार्थी व त्यांचे पालक यांच्यात कमालीची भीती पसरली आहे. रस्त्याने चालणाऱ्यांच्या हातातील पिशव्या ओढणे, त्यांच्या अंगावर धावून जाणे असा प्रकार या मोकाट जनावरांकडून सातत्याने होत असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी कायम आहे.

गुरुवारी (ता. २८) दुपारी महामार्गालगतच्या संघवी कॉलनीत आपल्या मित्राकडे धावत जाणाऱ्या दिग्वीजय पाटील या विद्यार्थ्यांच्या मागे कुत्र्यांचा घोळका लागला. त्याला सुमारे दहा ठिकाणी कुत्र्यांनी चावा घेतला. त्या विद्यार्थ्याची आई व परिसरातील रहिवासी धावत आले नसते तर कुत्र्यांनी या विद्यार्थ्याचे अक्षरश: लचके तोडले असते.

हा विद्यार्थी खासगी रुग्णालयात उपचार घेत असून, या घटनेमुळे पुन्हा एकदा मोकाट जनावरे व कुत्र्यांचा विषय चव्हाट्यावर आला आहे. मोकाट कुत्रे अथवा जनावरे यामुळे अपघात होऊन जीवित हानी झाल्यास पालिका प्रशासनाविरोधात सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करावेत, असा संतप्त सूर त्रस्त नागरिकांमधून व्यक्त होऊ लागला आहे.

"कॉलनी परिसरात कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढत आहे. परिसरात उघड्यावर मास विक्रेते आपणाकडील घाण टाकत असल्याने कुत्रे आक्रमक झाले आहेत. मित्राकडे जाणाऱ्या माझ्या मुलावर कुत्र्यांनी केलेला हल्ला संतापजनक असून, पालिकेने याबाबत कठोर उपाय योजावेत. जेणेकरून अनेकांचे प्राण वाचविणे शक्य होईल." - सचिन पाटील, जखमी विद्यार्थ्याचे पालक

"पालिका हद्दीतील मांस विक्रेत्यांना त्यांच्याकडील घाण उघड्यावर टाकू नये, या संदर्भात वेळोवेळी लेखी व तोंडी सूचना दिल्या जातात. मास विक्रेत्यांनी आपणाकडील रक्त, मासाचे तुकडे खड्डा करून त्यात बुजून त्याची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. उघड्यावर घाण टाकणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल." - वीरेंद्र घारू, पालिका आरोग्य निरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT