जळगाव : जिल्ह्यातील पावसाचे सर्वसाधारण प्रमाण गेल्या ४ वर्षात वाढले आहे. सरासरी पाऊस वाढला असला तरी यंदा ‘अल निनो’मुळे (सागरी प्रवाह) यावर्षी घट होण्याची शक्यता आहे.
शेतकरी, बागायतदारांमध्ये भीती असून, पाणीपुरवठा करणाऱ्या संस्था नियोजनात गुंतल्या आहेत. धरणातील उपलब्ध पाणीसाठा काटकसरीने वाटपाच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी पाटबंधारे अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. (fate of rainfall depends on El Nino jalgaon news)
गेल्या चार वर्षापासून चांगला पाऊस होत असल्याने पाणीटंचाई फारशी जाणवली नाही. जिल्ह्यात जून ते ऑक्टोबरअखेर पाऊस पडतो, मात्र तो गेल्या दोन वर्षापासून जुलैपासून सुरूर होऊन डिसेंबरपर्यंत पाऊस पडत आहे. नंतर अवकाळी पाऊस रब्बीचे नुकसान करतो. जिल्ह्याच्या सर्व भागात समान पाऊस पडत नसला तरी जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस पडतो.
जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडील आकडेवारीनुसार २०१४, २०१५ मध्ये सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाले. २०१४ मध्ये सरासरीच्या तुलनेत १५ टक्के, २०१५ मध्ये ३५ टक्के पाऊस कमी झाला.
यामुळे पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले. यंदा जिल्ह्यात 'अल निनों मुळे पाऊस कमी होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. त्याबाबत जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी काही दिवसांपूर्वी आपत्ती व्यवस्थापन, सर्व धरणाच्या अभियंते, संबंधितांची बैठक घेऊन, पाऊस कमी होण्याची शक्यता वर्तविली आहे. परंतु गेल्या काही वर्षांतील पर्जन्यमान पाहिले तर जिल्हातील पाऊस फारसा कमी होणार नाही, असा अंदाज आहे.
हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?
‘अल निनो' प्रक्रियेने घबराट निर्माण झाली आहे. शेतकरी, बागायतदार चिंतेत असून, पाणीपुरवठा करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थामधील अधिकारी सजग झाले आहेत. ‘अल निनो' मुळे पाऊस लांबणीवर जाऊ शकतो, त्यामुळे आहे तो पाणीसाठा पाऊस पडेपर्यंत कसा वापरायचा याचे नियोजन केले जात आहे.
काय आहे अल निनो
अतिउष्णतेमुळे अमेरिकेच्या पश्चिम समुद्रातील पाणी तापून तापमान वाढल्याने प्रशांत महासागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे हिंदी महासागरातील थंड वाऱ्यांची दिशा दक्षिण अमेरिकेकडे वळल्याने भारतातील पाऊस लांबणीवर पडून एकूण पाऊस कमी होणार, असा हवामानाचा अंदाज आहे. 'अल निनो’च्या प्रभावामुळे उन्हाळा आणखी ‘कडक’ होतो. हिवाळा उबदार होतो. गार वारेसुद्धा अनुभवण्यास मिळतात. यामुळे मॉन्सून कमकुवत होतो.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.