fighting  sakal
जळगाव

Jalgaon : जुगार अड्ड्यावर राडा; जिंकणाऱ्यावर तिघांचा प्राणघातक हल्ला

जिंकलेले पैसे मागितल्याच्या रागातून तरुणाला तीन जणांनी बॅटने मारहाण केली.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जुगारात जिंकलेले २५ हजार रुपये मागितल्याच्या रागातून तरुणाला तीन जणांनी बॅटने मारहाण केली. डोक्याला गंभीर दुखापत केल्याची घटना रात्री घडली आहे. याप्रकरणी तीन जणांविरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Fight at a gambling den in Jalgaon)

रामानंदनगर पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, इम्रान शेख हमीद (वय २५, रा. सुन्नी मसजिद, पिंप्राळा हुडको) आजीसोबत वास्तव्याला आहे. मजुरी करून तो आपला उदरनिर्वाह करतो. शनिवारी (ता. १४) रात्री साडेअकरा ते मध्यरात्री एक वाजेदरम्यान पिंप्राळा हुडको येथील कच्ची खोली भागात पठाणाच्या जुगार अड्ड्यावर इम्रान शेख जुगार खेळण्यासाठी गेला होता. जुगारात नशीब उजळल्याचे काहीच तासात इम्रानने २५ हजार रुपये जिंकले होते. जुगारात त्याने जिंकेलेले २५ हजार रूपये मागितले. यावरुन जुगार अड्डा चालक पठाण बंधूंचे पित्त खवळले. जुगारअड्डा चालक जाकिर पठाण, जावेद पठाण, रसुल पठाण (सर्व रा. पिंप्राळा हुडको) यांच्यात वाद झाला. जुगारात जिंकलेले २५ हजार देत नाही तुझ्याकडून जे होते ते करुन घे असे म्हणत त्यांनी इम्रानला पिटाळून लावले. परिसरात पठाणांची प्रचंड दहशत असून एकटा इम्रान रात्री काही न बोलता घरी निघून आला.

परिसरात ‘पठाणी’ दहशत

पिंप्राळा हुडको परिसरात ‘पठाण’ टोळीचे बऱ्यापैकी प्रस्थ आहे. राजकीय वलय असल्याने पोलिसांत बऱ्यापैकी उठबस आहे. हुडको परिसरात कच्ची खोली येथे पठाण टोळीचा मोठा जुगार व मटक्याचा अड्डा चालवला जातो. येथेच काल राडा झाला. इम्रान शेख याला २५ हजार रुपये ही रक्कम खूप होती. मात्र, पठाण टोळीच्या दहशतीने तो रात्री जुगार अड्ड्यावरुन निमूटपणे निघून आला. दिवस उजाडल्यावर परत पैशांसाठी याला-त्याला घेउन येईल वाद घालेल याची खात्री असल्याने जुगार अड्डाचालक जाकिर पठाण, जावेद पठाण आणि रसूल पठाण असे तिघे इम्रानच्या घरी धडकले. लोखंडी रॉड, बॅट अशांनी हल्ला करुन त्यांनी इम्रानला लोळवून बेदम मारहाण केली. पहाटेच्या शांततेत मारहाणीच्या आवाजाने शेजाऱ्यांनी धाव घेत इम्रानचा जीव वाचवला. तातडीने त्याला जिल्‍हा रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले.

तिघांवर गुन्हा दाखल

जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल जखमी इम्रान शेख हमीद याने दिलेल्या जबाबावरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात माजी नगरसेविका पती रसूल पठाण याच्यासह जाकिर पठाण, जावेद पठाण अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार कालसिंग बारेला करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT