Officers and members discussing the ban on tree felling at the monthly meeting of the Gram Panchayat esakal
जळगाव

वृक्षतोड केल्यास 5 हजारांचा दंड; कुंभारी ग्रामपंचायतीत ठराव मंजूर

सकाळ वृत्तसेवा

वाकोद (जि. जळगाव) : कुंभारी बुद्रुक (ता. जामनेर) येथील ग्रापंचायतीच्या (Gram Panchayat) मासिक सभेत वृक्षतोडीसंदर्भात (Cutting trees) ठराव पारीत करण्यात आला. ग्रांपचायत सदस्य व पर्यावरणप्रेमी प्रभाकर साळवे यांनी या बैठकीत सुचित केले, की आपल्या गावातील वृक्षतोड बंदी करण्यात यावी, जेणेकरून पर्यावरणाचा रास थांबेल. वृक्षतोडीमुळे पृथ्वीची अवस्था बिकट होत चालेली आहे. पृथ्वीवरील वातावरणाचा (Global Warming) तोल ढळत आहे. बेसुमार वृक्षतोडीमुळे पृथ्वी एक दिवस रसातळाला जाईल, अशी भीती निर्माण झाली आहे. वृक्षतोडीमुळे प्राण्यांचा आसरा नष्ट होत आहे. ते मानवी वस्तीकडे वळू लागले आहेत. अनेक ठिकाणी मानवी वस्तीत बिबट्या घुसण्याच्या घटना घडत आहेत. या संकटांचा सामना करण्यासाठी काही नियम व अटी ठरावात मंजूर करण्यात आल्या. त्यात ज्या शेतकऱ्याला वृक्षतोड करायची असेल त्या ठिकाणी दहा वृक्ष लावणे बंधनकारक राहील. विना परवानगी वृक्षतोड केल्यास त्या व्यक्तीस पाच हजारांचा दंड व कायद्यानुसार होणारी शिक्षा भोगावी लागेल. (fine of Rs 5000 for cutting trees Resolution approved in Kumbhari Gram Panchayat Jalgaon News)

संबंधित विभागाची व ग्रापंचायतची परवानगी न घेता कोणत्याही ठेकेदाराने वृक्षतोड केल्यास व दोषी आढळल्यास त्याला ५१ हजारांचा दंड व कलम १९५५ कायदा (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा. जो शेतकरी संबंधित ग्रापंचायत हद्दीत वृक्षतोड करेल, त्याने संबंधित विभागाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक राहील. वरील नियमाचे काटेकोर पालन करण्यात यावे, असे सर्वानुमते ठरावात नमूद करण्यात आले. या वेळी ग्रापंचायत ग्रामसेवक दादाराव अहिरे, सरपंच गयाबाई जोशी, उपसरपंच गुलाबकोरबाई राजपूत, सदस्य दुर्योधन पाटील, राजकुमार जोशी, सारिकाबाई जोशी, हिराबाई मोरे यांनी ठरावास मंजुरी दिली. सदस्य प्रभाकर साळवे यांनी सर्वांचे आभार मानले. माजी सरपंच व पर्यावरणप्रेमी राणुगोपा जोशी यांना खरी आदरांजली आहे, असे साळवे म्हणाले.

माजी सरपंच सुरतसिंग जोशी, डिगांबर जोशी, सतीश बिऱ्हाडे, फालसिंग मोरे, हरचंद गोपाळ, नंदू मंडाळे, राजू धुमाळ, राजू जाधव, नारायण मोरे, रावसाहेब मोरे, अशोक भिसे यांनी या निर्णयाचे स्वागत केले.

"पुढील ग्रामसभेत समिती गठीत करण्यात येणार असून, प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर किती झाडे आहेत, याबद्दल वृक्षगणना केली जाणार आहे."

- प्रभाकर साळवे, ग्रांपचायत सदस्य, कुंभारी बुद्रुक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT