A fire broke out at the house of corporator Manoj Jagdale. 
जळगाव

Jalgaon Fire Accident: पारोळ्यात नगरसेवक जगदाळेंच्या घराला आग; कोट्यवधीची हानी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Fire Accident : येथील नगरसेवक मनोज जगदाळे यांच्या घराला आज (ता.१३) रात्री आग लागली. यात कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार खांडेकरवाडा येथे नगरसेवक जगदाळे यांचे घर आहे. या घराला रात्री आठ ते नऊच्या सुमारास आग लागली. क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले. ( fire broke out at house of corporator Jagdale in Parola jalgaon news )

मिळेल त्या साधनांनी आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू झाले, मात्र आग भडकल्याने घरातील संसारोपयोगी वस्तूंसह इलेक्ट्रिक साहित्य जळून खाक झाले. आगीचे लोळ शहरात सर्वत्र दिसत असल्याने नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती समजताच शहरातील रहिवासी व खांडेकरवाडा येथील नागरिकांनी धाव घेत आग विझविण्यासाठी मदत केली. माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पाटील,

माजी नगरसेवक मनीष पाटील, माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे, माजी आरोग्य सभापती भय्या चौधरी, कैलास पाटील, माजी नगरसेवक पी.जी पाटील यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी पारोळा, एरंडोल, धरणगाव, अमळनेर तसेच संदेश कृषी सेवा केंद्राच्या खासगी टँकरना पाचारण केले.

दरम्यान आगीचे तांडव रात्री अकरापर्यंत सुरू होते. पोलिस निरीक्षक सुनील पवार, उपनिरीक्षक राजू जाधव, गोपनीय विभागाचे महेश पाटील यांच्यासह पोलिस कर्मचारींनी गर्दी आटोक्यात आणत मदतकार्यात हातभार लावला.

आगीचे कारण अस्पष्ट

या आगीत संसारोपयोगी वस्तूंसह इलेक्ट्रॉनिक वस्तू खाक झाल्या. यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समोर आलेले नाही. घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीनंतर घरात असलेल्या सदस्यांना गल्लीतील युवकांनी प्रसंगावधान राखत सुखरूप बाहेर काढले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: मुल्ला मौलवी उद्धव ठाकरेंसाठी फतवे काढताहेत, राज ठाकरेंचा आरोप! पुतण्याच्या बालेकिल्ल्यात काढला फतवा

Aditya Thackeray: सत्तेत आल्यास पहिला निर्णय शेतक-यांच्या कर्जमाफीचा! आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा

Raj Thackeray: “….तर तोंड दाखवणार नाही”; राज ठाकरेंचं मशिदीवरील भोंगे, रस्त्यावरील नमाजबाबत मोठं विधान

MP Priyanka Chaturvedi : त्यांचे विचार हे, त्यांची घाणेरडी नियत आहे, त्यांच्या शब्दाने समोर येत आहे... त्यांना माहितीये ते हरणार आहेत..

Sports Bulletin 7th November: रणजी ट्रॉफीचा दुसरा दिवस श्रेयस अय्यरने गाजवला ते महिला प्रीमिअर लिगची रिटेन लिस्ट जाहीर

SCROLL FOR NEXT