Gajanan Pise, Yogesh Tharnerkar, Govind Aggarwal, Ankush Pawar, Kadoba Mali, Namdev Bari etc. at the inauguration of CCI Cotton Procurement Center at Gopala Ginning. esakal
जळगाव

Jalgaon CCI Centre : खानदेशातील पहिले सीसीआय केंद्र शेंदुर्णीत; पहिल्याच दिवशी उत्पादकांच्या रांगा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon CCI Centre : येथील गोपाला जीनिंगमध्ये खानदेशातील पहिले सीसीआय केंद्र सुरू झाले असून, कापसाला प्रतिक्विंटल सात हजार २० चा भाव देण्यात आला.

पहिल्याच दिवशी मंगळवारी (ता. २८) शेतकऱ्यांच्या रांगा पाहायला मिळाल्या.( First CCI center in Khandesh at Shendurni jalgaon news )

बहुलखेडा येथील शेतकरी अंकुश लक्ष्मण पवार यांच्या कपाशीच्या ट्रॅक्टरची पूजा करून व ‘सीसीआय’चे प्रभारी अधिकारी गजानन पिसे यांनी पवार यांना रूमाल, टोपी घालून कापूस खरेदीस प्रारंभ केला.

या वेळी पाचोरा येथील प्रभारी अधिकारी योगेश थारनेरकर, बोदवड येथील प्रभारी अधिकारी प्रवीण पाटील उपस्थित होते. तसेच, गावातील गोविंद अग्रवाल, भाजपचे ज्येष्ठ नेते कडोबा माळी, नामदेव बारी, नीलेश थोरात, शंकर बारी, पंकज सूर्यवंशी, मनोज अग्रवाल, नितीन अग्रवाल, सुनील अग्रवाल, युवराज सूर्यवंशी उपस्थित होते.

कापूस खरेदीसाठी आणण्यापूर्वी शेतकऱ्याने रजिस्ट्रेशन करून घेणे गरजेचे आहे. जेणेकरून त्याचा वेळ वाचेल, तसेच आधारकार्डला मोबाईल क्रमांक लिंक असावा आणि बँकेला आधार लिंक असणे गरजेचे आहे. तीन दिवसांत शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होतील.

तसेच, सात-बारावर चालू वर्षात कपाशीचा पीकपेरा असणे आवश्यक आहे. कपाशीचे माइश्‍चर ८ ते १२ टक्के असावे, अशी माहिती शेंदुर्णी केंद्राचे प्रभारी अधिकारी पिसे यांनी दिली. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून आपला माल सीसीआय केंद्रावर खरेदीसाठी आणावा, असे आवाहन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT