Jalgaon News : येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रभान रामचंद्र सूर्यवंशी (पहिलवान) (वय ७६) यांचे शनिवारी (ता. २७) पहाटे अडीचला हृदयविकाराने निधन झाले. यांनी मृत्यू होण्याच्या आधी देहदानाचा संकल्प करून देह साकेगाव येथील चैतन्य आयुर्वेदिक महाविद्यालयास अर्पण करावा, अशी इच्छा व्यक्त केली होती.
त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या कुटुंबीयांनी मृत्यूनंतर चैतन्य महाविद्यालयाशी संपर्क साधून त्यांचा देह शनिवारी (ता. २७) सुपूर्द केला. (First time body donation in Nimbhori history jalgaon news)
चंद्रभान सूर्यवंशी पंचक्रोशीत सामाजिक क्षेत्रात अग्रेसर होते. त्यांनी मोठ्या प्रमाणावर रुग्णसेवा केली.
यात त्यांनी लकवा (पॅरालिसिस) तसेच हाडे मोडलेले फॅक्चर झालेल्या अशा रुग्णांची सेवा नि:शुल्क, निःस्वार्थपणे केली. ते निर्व्यसनी होते.
त्यांनी आपल्या जीवनात सामाजिक कार्याबरोबरच नाट्य मंडळ, व्यायामशाळा, व्यसनमुक्ती तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविले.
ते नेहमी सायकलने प्रवास करीत. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, असा परिवार आहे. ते संतोष व उमेश सूर्यवंशी यांचे वडील होत.
दरम्यान, निंभोरा गावाच्या इतिहासात प्रथमच देहदान करण्यात आले. त्यांच्या या कार्याने त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या शरीराचा उपयोग वैद्यकीय रुग्णालयाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी उपयोगी पडणार आहे, हे विशेष. ‘मरावे परी कीर्ती रूपी उरावे’, ही म्हण त्यांनी सार्थ केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.