Girish Mahajan News : राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे धुळे, लातूर, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मात्र मंगळवारी (ता. १५) स्वांतत्र्य दिनी ते नाशिकमध्ये शासकीय झेंडावंदन करणार आहेत. (Flag hoisting by Guardian Minister Mahajan in Nashik on independence day jalgaon news)
नाशिक हे महाजन यांचे आवडते कार्यक्षेत्र असल्याने त्यांच्या हस्ते झेडांवंदन करून भाजपने या निमित्ताने राजकीय संदेश दिल्याचेही सांगण्यात येत आहे. नाशिकचे पालकमंत्री शिंदे गटाचे दादा भुसे आहेत. याठिकाणी अजित पवार गटाचे छगन भुजबळही मंत्री आहेत. परंतु मुंबई, पुण्यानंतर भाजपसाठी नाशिक हे महत्वाचे शहर आहे.
नाशिकचे पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांनी भूषविले आहे. तसेच, नाशिकमध्ये भाजप वाढीसाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. राज्यात शिंदे- फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर नाशिकचे पालकमंत्रीपद श्री. भुसे यांच्याकडे आले. तर श्री. महाजन यांच्याकडे धुळे, लातूर, नांदेडचे पालकमंत्रीपद आले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यावेळी भाजपने महाजन यांना नाशिकमधून हटविले असे म्हटले जात होते; परंतु आता पुन्हा त्यांच्या हस्ते नाशिकला झेंडावंदन होत असल्याने, भाजप आता पुन्हा नाशिक महाजन यांच्याकडे देण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. महाजन हे उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे मानले जातात.
तसेच, त्यांना भाजपमध्ये संकटमोचक असेही म्हटले जाते. त्यामुळे, महाजन यांच्या हस्ते नाशिकला शासकीय झेंडावंदन करून फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाजन यांचा नाशिक येथेच वकूब असल्याचे दाखवून दिले आहे. नाशिक येथे भाजप अधिक बळकट करण्यासाठी हा प्रयत्न असल्याचेही म्हटले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.