Jalgaon News : शहरातील रस्त्याच्या कामांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे मक्तेदारांना वाळू उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे आता ‘आर्टीफिशीयल वाळू’ वापरण्याची सद्यस्थितीत गरज नसल्याचे दिसून आले आहे.
जळगाव शहरातील रस्त्याची कामे महापालिका फंडातून करण्यात येत आहेत. महापालिकेने या रस्त्याच्या निवीदा काढून मक्तेदारांना कामाचे आदेशही दिले आहेत. यात बहुतांश कामे सिमेंट कॉंक्रिट रस्त्यांची आहेत. त्या कामांसाठी वाळूची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अगोदर करण्यात आली होती.
मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी वाळू देण्यास असमर्थता दर्शवित आर्टीफिशीयल वाळू वापरण्यास सांगितले होते. (For city road works Sand will be available to monopolists jalgaon news)
त्यामुळे महापालिकेने रस्ते कामासाठी आर्टीफिशीयल वाळू वापरण्याबाबत आदेश काढण्याचा निर्णय घेतला होता. त्याबाबत महापालिकेच्या बांधकाम विभागाने प्रस्तावही तयार केला होता. प्रशासक तथा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या स्वाक्षरीनंतर तो आदेश लागू करण्यात येणार होता.
दरम्यान, नदीची वाळू उपलब्ध करण्याबाबत मक्तेदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले होते. त्यावर कार्यालयातर्फेही विचार सुरू होता. त्यातच आता काही चोरटी वाळू जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने या वाळूचे लिलाव करून ते देण्याची तयारी दाखविली आहे.
मक्तेदाराने आपल्या रस्त्याच्या कामाचे कार्यादेश जिल्हाधिकारी कार्यालयाला द्यावयाचे आहेत. त्यानुसार काही मक्तेदारांनी आपल्याला मिळालेले कामाचे आदेश सादर केले आहेत. त्यामुळे आता या मक्तेदारांना कामासाठी वाळू उपलब्ध होणार असून, मक्तेदारातर्फे लवकरच काम सुरू होणार आहे.
"मक्तेदारांना जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे रस्त्याच्या कामासाठी वाळू उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आर्टीफिशीयल वाळू वापरण्याचा आदेश काढण्यात आलेला नाही. परंतु, शासनाच्या आदेशातच आर्टीफिशीयल वाळू वापरण्याबाबत कळविण्यात आले आहे. त्यामुळे जे मक्तेदार आर्टीफिशीयल वाळू वापरतील त्यांना त्याची परवानगी देण्यात येईल." -चंद्रकांत सोनगिरे, शहर अभियंता, महापालिका, जळगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.