funding esakal
जळगाव

Jalgaon News : ज‍िल्हा वार्ष‍िक योजनेत 607 कोटींचा नियतव्यय मंजूर

ज‍िल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने २०२४-२५ या आर्थ‍िक वर्षासाठी ज‍िल्हा वार्ष‍िक योजना (सर्वसाधारण) साठी ६०७ कोटी रूपयांचा न‍ियतव्यय मंजूर केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : ज‍िल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने २०२४-२५ या आर्थ‍िक वर्षासाठी ज‍िल्हा वार्ष‍िक योजना (सर्वसाधारण) साठी ६०७ कोटी रूपयांचा न‍ियतव्यय मंजूर केला आहे. मागील वर्षापेक्षा यात ९७ कोटींची वाढ झाली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी न‍िधी वाढीसाठी व‍िशेष प्रयत्न केले.

राज्यस्तरीय बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापुढे वाढीव निधीचे क्षेत्रनिहाय सादरीकरण केले. यामुळे वाढीव नियतव्यय शासनाने मंजूर केला आहे. (for development State Government has approved an allocation of Rs 607 crore for jalgaon District news)

जळगाव ज‍िल्हा वार्ष‍िक योजना (सर्वसाधारण) २०२३-२४ या आर्थ‍िक वर्षासाठी ५१० कोटींचा न‍ियतव्यय मंजूर केला होता. मात्र, हा न‍िधी ज‍िल्ह्याच्या व‍िकासासाठी अत‍िशय कमी असल्याने यात वाढ करून ज‍िल्ह्यासाठी ६०७ कोटी रूपये मंजूर करावेत, अशी मागणी पालकमंत्र्यांनी केली होती.

त्यानुसार व‍ित्त व न‍ियोजन मंत्री अजित पवार यांनी वाढीव न‍िधी मागणीनुसार जिल्ह्याच्या व‍िकासासाठी शासनाने ६०७ कोटी रूपये मंजूर केले.वित्त विभागाचे आदेश ज‍िल्हा न‍ियोजन सम‍ितीला नुकतेच प्राप्त झाले.

राज्यात गतीने होत असलेले नागरीकरणाच्या प्रमाणात ज‍िल्हा वार्ष‍िक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतींना व‍िशेष अतिर‍िक्त न‍ियतव्यय उपलब्ध करून देण्याची आवश्यकता विचारात घेऊन २०२४-२५ या वर्षासाठी ज‍िल्ह्याला ७९ कोटी ५३ लाखांचा व‍िशेष अत‍िरिक्त नियतव्यय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

विकास आराखड्यासाठी २५ टक्के

राज्य शासनाच्या सूचनानुसार ज‍िल्हा विकास आराखड्यात मंजूर न‍ियतव्ययापैकी क‍िमान २५ टक्के न‍िधी ज‍िल्हा व‍िकास आराखड्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. न‍ियोजन विभागाच्या १८ ऑक्टोबर २०२३ च्या मार्गदर्शक सूचनांनुसार, नावीन्यपूर्ण योजना, शाश्वत व‍िकास ध्येय आण‍ि मूल्यमापन सनियंत्रण व डाटा एन्ट्रीसाठी ५ टक्के न‍िधी.

मह‍िला व बाल व‍िकास व‍िभागाच्या सर्वसमावेशक योजनांसाठी ५ टक्के, सांस्कृत‍िक कार्य व‍िभागाच्या गड-‍क‍िल्ले, मंदीरे व महत्त्वाची संरक्ष‍ित स्मारके इत्यादींचे संवर्धन या योजनेसाठी ३ टक्के, महसूल विभागाच्या गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण या योजनेसाठी कमाल ५ टक्के न‍िधी राखीव ठेवण्याच्या शासनाच्या सुचना आहेत.

नवीन मार्गदर्शक सुचनानुसार

- विकास आराखड्यासाठी २५ टक्के

- सर्वसमावेश योजनासाठी ५ टक्के

- गड किल्ले, स्मारक संरक्षण ३ टक्के

- आपत्तकालीन व्यवस्था ५ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT