जळगाव : विधानपरिषदेचे माजी आमदार डॉ. गुरूमुख जगवाणी यांच्या अटकेच्या तयारीत असलेल्या पोलिस पथकाच्या हाती ऐन वेळेस जिल्हा न्यायालयाच्या जामीन आदेश आला अन् जगवाणींसह इतरांची अटक टळली.
पिंप्राळा येथील जमिनीच्या बोगस व्यवहाराप्रकरणी दाखल गुन्ह्यात मंगळवारी पोलिस पथके त्यांच्या अटकेच्या तयारीत होते.शहरातील भोईटेनगरातील रहिवासी अशोक राणे कानळदा येथील जिल्हा ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष, तर मधुकर भंगाळे सचिव आहेत.
अजगर पटेल याने १३ मार्च २०१३ ला जळगाव जिल्हा ग्रामसुधार समितीच्या नऊ सदस्यांची यादी देऊन त्यात स्वत: संस्थेत सचिव असल्याचे नमूद केले होते, तसेच संस्थेच्या मालकीची पिंप्राळा शिवारातील शेत गट क्रमांक ३३८/१ क्षेत्र 66 आर., गट क्रमांक ३३९/अ क्षेत्र९५ आर., असे एकूण क्षेत्र एक हेक्टर ६९ आर. हा भूखंड विक्रीची परवानगी मिळण्यासाठी त्याने नाशिक धर्मदाय आयुक्त कार्यालयात अर्ज दाखल केला होता. (Former MLA Jagwani Narrowly avoided Arrest Jalgaon News)
मात्र, संस्थेचे अध्यक्ष अशोक राणे यांनी पटेल यांच्या अर्जाचे अवलोकन केल्यानंतर अर्जात पटेल याने ३ मार्च २०१२ ला संस्थेच्या जनरल मिटींगमध्ये नवीन कार्यकारिणी निवडल्याचे म्हटले होते. कार्यकारिणीचा चेंज रिपोर्ट खोटे व बनावट कागदपत्रसोबत सादर करून जळगाव सहाय्यक धर्मदाय आयुक्तांकडे दाखल केला असून, प्रस्ताव प्रलंबित असल्याचे नमूद करून चेंज रिपोर्टची प्रमाणित प्रत अर्जात जोडली आहे.
२००८ मध्ये मृत निर्मला पाटील यांचे नावही बनावट कार्यकारिणीत घेतले होते. पटेल यांनी आपण संस्थेचे सचिव असल्याचे शपथपत्रही अर्जासोबत जोडले होते. त्यानंतर कुणीही तक्रारदार नसल्याने १३ जून २०१३ ला पटेल यांचा अर्ज मंजूर होऊन त्यांना विक्रीची परवानगी मिळाली होती. याप्रकरणी माजी आमदार डॉ. गुरूमुख जगवाणी यांच्यासह तृतीयपंथी अजगर पटेल (रा. भादली), हरीश मंधवाणी, नीलेश विष्णू भंगाळे, विठ्ठल गलाजी सोळंकी, मीना विठ्ठल सोळंकी, एच. ए. लोकचंदाणी (सर्व रा. जळगाव) यांच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. डीवायएसपी भास्कर खैरे, चंद्रकांत शिंदे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
हेही वाचा : काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??
दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेचे डीवायएसपी भास्कर खैरे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक किशनराव नजनपाटील, निरीक्षक विजयकुमार ठाकरवाड, चंद्रकांत शिंदे, अधिकार पाटील आणि शहर पोलिस ठाण्याचे विशेष पथक अटकेच्या तयारीत होते. संशयितांतर्फे जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायाधीश काळे यांच्या न्यायालयात सुनावणी होऊन दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने जामीन मंजूर केला. जामीन आदेश पथकाच्या हाती पडल्यावर त्यांचा हिरमोड झाला. एकमेकांचे तोंड पाहून पथके माघारी परतल्याचे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.