Jalgaon News : व्यापारी, व्यावसायिक किंवा सावकराला न लुबाडता थेट आमदारांनाच गंडा घालण्याचा मुंबईतील पिता- पुत्राने धंदा अवलंबला होता. (Former MLA Sardesai along with Baviskar son frauded jalgaon fraud crime news)
दादरचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांच्या मुलास साडेतीन कोटी तर, जळगावच्या विधान परिषदेचे माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर यांच्या मुलास बासष्ट लाखांचा चुना लावून ठकसेन पिता- पुत्र रफुचक्कर झाले होते.
शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी तपासात विजय रमेश वैद्य या भामट्याला मुंबईच्या कारागृहातून अटक केली आहे. माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर यांचे चिरंजीव राहुल बाविस्कर (३१) यांची मुंबईत जयको ग्लोबल नावाची कंपनी असून जळगाव शहरात मध्यवर्ती गोलाणी मार्केटमध्ये त्याचे कार्यालय आहे.
मुंबईतील रोहन विजय वैद्य आणि विजय वैद्य (दोन्ही रा. सेनापती बापट रोड, मुंबई) हे दोघे राहुल बाविस्कर या पिता- पुत्राने राहुलचा विश्वास संपादन करून बँकेकडून दोन डंपर खरेदी करण्यास सांगितले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यानुसार राहुलने बँकेतून कर्ज काढून २०१८ मध्ये डंपर खरेदी केले. त्यानंतर डंपरचे मासिक हप्ते ६० हजार रुपये करारनामा नुसार देण्याचे दोघांनी कबूल केले होते. मात्र त्यांनी मासिक हप्ते न भरता थकविले आणि राहुल यांच्याकडून १० लाख रुपये घेतले. असे एकूण ६२ लाख ६२ हजारांचा गंडा घालून दोघेही पिता-पुत्र पसार झाले.
याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपासाधिकारी रवींद्र सोनार यांच्यासह तपास पथकाने विजय रमेश वैद्य याला मुंबईच्या ऑर्थर रोड कारागृहातून काल अटक करून जळगावी आणले. जिल्हा न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली.
सरदेसाईंना साडेतीन कोटीला गंडवले
दादरचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांच्या मुलाच्या नावे असलेल्या बँक खात्यातून बनावट सह्या करून या भामट्या पिता- पुत्राने चक्क साडेतीन कोटी रुपये लुबाडले. याप्रकरणी गुन्हा दाखल असून त्यात दोन महिने कारागृहात होते.
या भामट्या पिता- पुत्रांनी अनेकांना असाच कोट्यवधीचा चुना लावला असल्याचे तपासाधिकाऱ्यांनी सांगितले. माहीम पोलिसांत दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यात ऑर्थर रोड कारागृहात असल्याची माहिती मिळाल्यावर विजय वैद्य यास शहर पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.