Pachora Agricultural Produce Market Committee  esakal
जळगाव

Pachora Market Committee Election : सर्वांसोबत चर्चा, अद्याप निर्णय नाही; दिलीप वाघ यांची पत्रकार परिषद

सकाळ वृत्तसेवा

Pachora Market Committee Election : पाचोरा - भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व खरी भाजप एकत्र येऊन निवडणूक लढविणार असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी भडगाव व पाचोरा येथील पत्रकार परिषदेत जाहीर केल्यानंतर त्या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन याबाबतचे स्पष्टीकरण दिले. (Former NCP MLA Dilip Wagh held a press conference and explained that MLA Kishor Patil statement is not final at present jalgaon news)

सर्वांशी चर्चा झाली, बोलणी सुरू आहे अजून अंतिम निर्णय नाही, आमदार किशोर पाटील यांनी केलेले विधान सध्या तरी अंतिम नसल्याचे स्पष्ट केले. दिलीप वाघ यांनी सोमवारी सकाळी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. या वेळी संजय वाघ, खलील देशमुख, नितीन तावडे, सतीश चौधरी, हर्षल पाटील, विकास पाटील, रणजित पाटील, हारुण देशमुख, डी. डी. पाटील, भूषण वाघ आदी उपस्थित होते.

या वेळी दिलीप वाघ यांनी आमदार किशोर पाटील यांच्या राष्ट्रवादीशी केलेल्या आघाडीसंदर्भातील विधान खोडले. बाजार समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मेळावा घेतला. इच्छुक उमेदवारांची मते जाणून घेतली, मुलाखती घेतल्या आहेत. दरम्यान, २८ एप्रिलला १८ जागांसाठी मतदान होणार असून, राष्ट्रवादी काँग्रेस वगळता इतर कोणत्याही पक्षाला बाजार समितीची सत्ता मिळवणे कदापि शक्य नाही.

बाजार समितीची परिस्थिती पाहता निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी प्रामाणिक इच्छा आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाशी व काँग्रेसशी आमची आघाडी असल्याने त्यांच्यासोबत तसेच शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांचे सोबत दोन वेळा चर्चा झाल्या. जागा वाटपसंदर्भातही प्राथमिक बोलली झाली. परंतु अजून कोणासोबत जायचे? याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. कारण ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

मोठ्या निवडणुकीचा हा पाया आहे. पक्षाचे राज्य, जिल्हा पातळीवरील वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी युती व आघाडीबाबत चर्चा करून त्यांच्या इच्छेनुसार कोणासोबत राहायचे? हा निर्णय होईल.

माजी आमदार म्हणून मला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निर्णयाचा अधिकार दिला असला तरी सर्वांना विश्वासात घेऊन जास्तीत जास्त कार्यकर्त्यांसाठी जागा कशा मिळतील व सन्मानपूर्वक कोणासोबत राहता येईल, या एकमुखी विचारानेच अंतिम निर्णय घेऊ.

येत्या दोन दिवसात त्या संदर्भात उद्धव ठाकरे गट, आमदार किशोर पाटील यांच्याशी बोलणे होऊन निर्णय होईल. आमदारांनी केलेले विधान हे तूर्तास तरी खरे नाही. सेना, भाजपची जशी नैसर्गिक युती आहे, तशी राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे शिवसेना व काँग्रेसची नैसर्गिक आघाडी आहे.

हा आघाडी धर्म पाळण्याचे कसोशीने प्रयत्न होतील. त्याबाबत दोन दिवसात अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे दिलीप वाघ यांनी सांगितले. संजय वाघ, खलिल देशमुख यांनीही भूमिका मांडली. पत्रकार परिषद तासभर चालली. विकास पाटील यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Visits Pune: डोनाल्ड ट्रम्प सुद्धा आहेत पुणेकर! जेव्हा फ्लॅट बघण्यासाठी आले अन् उभं केलं ट्रम्प टॉवर

Latest Marathi News Updates live : 'संविधान हे फक्त एक पुस्तक नाही' - राहूल गांधी

Donald Trump निवडून आले अन् नेटकऱ्यांनी विजयाचे क्रेडिट Elon Musk यांना दिले, सोशल मीडिया सुसाट.. भन्नाट मिम्स व्हायरल

ICC Test Rankings: मुंबईत बेक्कार हरले अन् कसोटी क्रमवारीत घसरले; विराट, रोहित तर टॉप २० मधून बाहेर फेकले गेले, Rishabh Pant...

PM Modi in Nashik : पंतप्रधानांच्या सभेसाठी शहर पोलिस सतर्क; आयुक्तालयातील बैठकीत कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन

SCROLL FOR NEXT