4th line of railway started till Bhusawal.  esakal
जळगाव

Jalgaon Bhusawal Railway : जळगाव-भुसावळ रेल्वेची चौथी लाइन सुरू; परिचालन विभागाची कामगिरी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Bhusawal Railway : जळगाव-भुसावळदरम्यान (Jalgaon Bhusawal) २५ किलोमीटरच्या चौथ्या रेल्वे लाइनचे काम पूर्ण करून ती वाहतुकीसाठी खुली झाली आहे. (Fourth line of Jalgaon Bhusawal railway started jalgaon news)

जळगाव ते पाचोरादरम्यान ४७.५९ किलोमीटरच्या तिसऱ्या रेल्वे लाइनचे काम पूर्ण होऊन मार्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे रेल्वेगाड्यांचा वेग वाढण्यास मदत झाली आहे.

भुसावळ मंडल परिचालन विभागाने २०२२-२३ या आर्थिक वर्षात ही कामे करून मध्य रेल्वेने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे प्रबंधक (डीआरएम) एस. एस. केडिया यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ विभागीय परिचालन प्रबंधक डॉ. रामनिवास मीना यांच्या नेतृत्वाखाली भुसावळ विभागातील रेल्वेचे परिचालन कार्य सुलभ व सुरक्षित केले आहे.

मनमाड-अंकाई किल्ला विभागातील ८.६३ किलोमीटरचे दुहेरीकरण करण्यात आले. यामुळे अप-डाउनची वाहतूक वेगळी झाली आहे. या व्यस्त विभागातील कामकाज सुरळीत झाले आहे. जळगाव ते पाचोरा या नवीन तिसऱ्या सिंगल लाइनवर ४७.५९ किलोमीटरचे विद्युतीकरण करून अप आणि डाउन वाहतूक सुरू आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

जळगाव ते भुसावळदरम्यान २५ किलोमीटरची नवीन चौथी लाइन सुरू झाली असून, ती पश्चिम रेल्वेला जोडली आहे. जेणेकरून पश्चिम रेल्वेकडे येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांचे परिचालन सुलभ होईल. माहेजी ते भुसावळ स्थानकावर रेल्वेगाडीचा वेग वाढविण्यासाठी लूप लाइनचा वेग १५ किलोमीटर प्रतितासवरून ३० किलोमीटर प्रतितास करण्यात आला आहे. खंडवा स्थानकावर नवीन फलाट क्रमांक सहाचे काम पूर्ण झाले आहे.

खंडव्यापासून रतलामकडे जाणाऱ्या ५.५४ किलोमीटरचा भाग नॅरोगेजमधून ब्रॉडगेजमध्ये बदलवला आहे. २४ डब्यांच्या रेल्वेसाठी खंडव्याच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढविली आहे. अमरावती स्थानकावरील २६ डब्यांची लांबी तपासण्यासाठी पीट लाइनच्या विस्तारीकरणासह यार्ड रिमॉडेलिंगचे काम पूर्ण झाले आहे. संपूर्ण लांबीच्या मालगाडीसाठी शिरसोली स्थानकाची डाउन लूप लाइन ७५३ मीटरने वाढविली आहे.

"जळगाव-भुसावळदरम्यान तिसरी व चौथी लाइन सुरू झाल्याने रेल्वेचा वेग वाढला आहे. यामुळे गाड्यांना होणारा विलंब टळेल तसेच प्रवाशांच्या वेळेचीही बचत होणार आहे." -एस. एस. केडिया, विभागीय रेल्वे प्रबंधक, भुसावळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह'प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT