Gajanan Mali and Alok Kumar Upadhyay eskal
जळगाव

Jalgaon Fraud Doctor : अपत्यप्राप्तीच्या नावाने फसविणारी टोळी उघड; बनावट डॉक्टरसह चौघांचा समावेश

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Fraud Doctor : अधिकृत वैद्यकीय पदवी नसताना डॉक्टर असल्याचे भासवत मूल होण्यासाठी औषध देऊन तालुक्यातील दोघांची सुमारे आठ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या जिल्ह्यातील एका टोळीचा रावेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील अनेकांना या टोळीने फसविले आहे. मुख्य सूत्रधारासह अन्य साथीदारांचा कसून शोध सुरू असून, या सर्वांनी मिळून सुमारे ३०-४० जोडप्यांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

वैद्यकशास्त्र विकसित झाले असले तरी विवाहानंतर काही जोडप्यांना लवकर मूलबाळ होत नसल्याने ते जोडपे किंवा त्यांचे कुटुंब सर्वच प्रकारचे उपाय करतात, हे आता लपून राहिलेले नाही. (fraud doctors in jalgaon crime news)

अशा जोडप्यांना हेरून त्यांना मूलबाळ होण्याची खात्री देत औषधांच्या नावाने फसवणूक करणारी टोळी जळगाव जिल्ह्यात कार्यरत होती.

हिंगणे बुद्रुक (ता. जामनेर, जि. जळगाव) येथील योगेश कैलासगिरी गोसावी (ह. मु. भोकरदन, जि. जालना) हा आपण डॉक्टर असल्याचे सांगून राहुल पाटील या नावाने समाजात वावरत होता. त्याच्यासोबत गजानन दगडू माळी व त्याचा भाऊ किशोर दगडू माळी (दोघेही रा. हिंगणे बुद्रुक) आणि नरेंद्र वीरेंद्र नामदेव (गोसावी, रा. भुसावळ) या चौकडीने वेळोवेळी अनेक जोडप्यांची आर्थिक फसवणूक केली आहे.

रावेर पोलिसांना सर्वप्रथम पातोंडी येथील विजय कौतिक पाटील यांना या टोळीने फसविल्याची माहिती मिळाली. विजय पाटील यांच्याकडून या चौघांनी वेळोवेळी तब्बल सहा लाख ६९ हजार रुपये उकळले आहेत. विजय पाटील यांना पोलिसांनी विश्वासात घेऊन माहिती घेतली. त्यांनी पोलिसांत तक्रार दिल्यावर तपास मोहीम सुरू झाली. मात्र, याचा सुगावा लागताच मुख्य सूत्रधारासह तिघे फरारी झाले. पण, गजानन माळी याला पोलिसांनी अटक केली.

औषध विक्रेत्यालाही अटक

रावेरचे पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार ईश्वर चव्हाण, प्रमोद पाटील, सचिन घुगे, विशाल पाटील, सुनील मोरे यांनी हिंगणे, कन्नड, जालना आदी ठिकाणी सापळा रचून टोळीला पकडण्याचा प्रयत्न केला.

तपासात नरेंद्र सुभाष कुंभार (रा. केऱ्हाळा, ता. रावेर) या दिव्यांग रिक्षाचालकालाही अशाच प्रकारे गोडीगुलाबीने फसवून या टोळीने त्याच्याकडून एक लाख ४५ हजार ६०० रुपये उकळले असल्याचे आढळून आले आहे.

या जोडप्यांना आयुर्वेदिक औषध विकणाऱ्या आलोककुमार उपाध्याय (रा. इंदिरानगर, बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) यालाही पोलिसांनी अटक केली. त्याला सोमवार (ता. २५)पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.

असे साधत असत सावज

या टोळीतील योगेश गोसावी याच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नाही. एखाद्या गावात मूलबाळ नसलेल्या जोडप्याचा शोध अन्य सहकारी घेत असत. आमच्या ओळखीचे एक डॉक्टर असून, त्यांच्या औषधामुळे अनेकांना गुण आला आहे. तुम्हीही प्रयत्न करायला हरकत नाही, असे सांगून डॉक्टरशी संपर्क साधून दिला जाई. या जोडप्याला एका विशिष्ट औषध दुकानातून औषध घेण्यास सांगितले जाई.

प्रेग्नन्सी टेस्टमध्ये हातचलाखी...

काही कालावधी गेल्यावर या जोडप्यातील महिलेची प्रेग्नन्सी टेस्ट करण्याचे नाटक केले जाई, ती टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचेही सांगितले जाई. यात एका परिचारिकेला हाताशी धरून हा कथित डॉक्टर अन्य गर्भवती महिलेचे सॅम्पल हातचलाखी करून त्या जोडप्यासमोर टेस्ट करायचा आणि टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, हे अजून कोणाला सांगू नका व आम्ही सांगतो ती औषध घ्या, असे सांगून मोठ्या प्रमाणात पैशांची मागणी केली जाई.

जळगाव जिल्ह्यात या टोळीने आतापर्यंत किमान ३०-४० जणांना अशा प्रकारे फसविले असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, अनेक जण संकोचामुळे तक्रारीस पुढे येत नाहीत, असे पोलिसांना आढळून आले आहे. मुख्य सूत्रधाराला अटक झाल्यावर गुन्ह्याची व्याप्ती वाढेल. अशी कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी रावेर पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT