Competitive Exam : महापालिकेतर्फे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दर महिन्याच्या पाच तारखेला हे मार्गदर्शन करण्यात येईल.
यात आय. ए. एस, आय. पी. एस., तसेच लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेले दोन अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. गुरूवार (ता. ५)पासून या उपक्रमास सुरवात होणार असून, राज्यात प्रथमच महापालिकेतर्फे असा उपक्रम राबविण्यात येत आहे.
स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळत नाही. त्यांना कोणती पुस्तके वाचावित याचीही माहिती मिळत नाही. (Free guidance to competitive exam students by Municipal Corporation jalgaon news)
तसेच परिक्षेची तयारी कशा पद्धतीने करावी याबाबत विद्यार्थी साशंक असतात. अशा पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दर महिन्याच्या पाच तारखेला सायंकाळी पाचला हे मार्गदर्शन मिळेल.
संबंधीत दिवशी कोणताही वार असला, तरी पाच तारखेला हे मार्गदर्शन होणार आहे. यात राज्यातील आय. ए. एस., आय. पी. एस. अधिकारी, तसेच राज्य लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार मार्गदर्शन करतील. दर वेळेस दोन अधिकारी कोणती पुस्तके वाचावित, कसा अभ्यास करावा याचे मार्गदर्शन करतील.
विषयनिहाय मार्गदर्शन
पाच ते सहा मार्गदर्शन सेमीनार झाल्यानंतर विद्यार्थ्याना विषयनिहाय मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्या-त्या विषयाचे तज्ज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.
आज पहिला मार्गदर्शन वर्ग
गुरूवारी (ता. ५) मार्गदर्शन वर्गाचा शुभारंभ होणार आहे. महापालिकेच्या सतरा मजली प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात सायंकाळी पाचला हा वर्ग होईल. महापालिका प्रशासक तथा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, फलटण (ता. सातारा) येथील रहिवासी व जळगाव येथील तहसीलदार गौरी धायगुडे, उमरेड येथील रहिवासी व जळगाव येथे कार्यरत असलेले सहाय्यक आयुक्त (जीएसटी) निरजंन कदम मार्गदर्शन करणार आहेत. स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी या वर्गाला उपस्थित राहावे, असे अवाहनही महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास पुढे छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात हे वर्ग घेण्यात येतील.
"स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्ग मोफत असणार आहे. आयएएस व आयपीएस अधिकारी, तसेच स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक माहिती देणार आहेत. महिन्यातून एकदाच हे मार्गदर्शन वर्ग असणार आहे." -डॉ. विद्या गायकवाड, प्रशासक तथा आयुक्त, महापालिका, जळगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.