yagnesh jeurkar esakal
जळगाव

Jalgaon News : तिसऱ्या वर्षापासूनच तबल्याच्या साधनेचा यज्ञ! चिमुरड्या यज्ञेशची तपस्या

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : झोळीत असतानाच ज्याच्या कानी तबल्याचे ‘ताक्‌-धीना-धीन्‌’, असे स्वर पडले, त्या बाळाचे तबल्यावर थिरकणारे चिमुकले हात पाळण्यातच दिसले नसतील, तरच नवल!

म्हणूनच की काय तबल्यावर बसण्याइतपत वय झाल्यावर या बाळाची साधना सुरू झाली. वयोमर्यादेत बसत नाही म्हणून अन्यथा ‘विशारद’पर्यंतच्या क्षमतेचे वादन हा बालक लीलया करू शकतो. (From third year yagnesh Jeurkar playing tabla jalgaon news)

होय..! जळगावच्या यज्ञेश जेऊरकर या पाचवीतील्या मुलाच्या संगीतसाधनेच्या यज्ञाची ही स्टोरी. आयडीबीआय बँकेत नोकरीस असलेल्या आणि स्वत: विशारद असलेल्या दर्शन जेऊरकर यांचा तो मुलगा. काका सारंगही तबल्याचे वादक. झोळीत काही केल्या झोप येत नाही, म्हटल्यावर अंगाई गीतापेक्षाही तबल्याचे स्वर कानी पडले की यज्ञेश झोपी जाई आणि तेथूनच त्याच्या तबल्याच्या साधनेचा यज्ञ सुरू झाला.

तिसऱ्या वर्षांपासून धडे

तबल्यावर बसण्याइतपत वय झाल्यानंतर म्हणजे वयाच्या तिसऱ्या वर्षापासून यज्ञेशने प्रत्यक्ष तबल्याचे धडे गिरविण्यास सुरवात केली. वडील दर्शन व काका सारंग, दोघेही तबल्यात विशारद. त्यामुळे प्रारंभी वडिलांकडूनच यज्ञेशने तबल्याचे शिक्षण घेतले.

मुलगा काहीतरी भन्नाट करतोय म्हणून दर्शन यांनी यज्ञेशची तबल्याप्रति गोडी पाहून त्याला तबल्यातील उच्च शिक्षणासाठी ठाण्यातील विख्यात तबलावादक स्वप्नील भिसे यांच्याशी जोडून दिले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पंजाब घराण्याचा बाज

पंजाब घराण्यातील जगविख्यात वादक उस्ताद अलारखाँसाहेब, उस्ताद झाकिर हुसेन यांच्या परंपरेतील शिष्य योगेश समशी यांचे शिष्य स्वप्नील भिसे. त्यांच्याकडे यज्ञेशने तबल्याचे धडे गिरविणे सुरू केले. ठाण्यात असलेले पंडित भिसे यज्ञेशला महिन्यातून दोन दिवस ठाण्यात आणि आठवड्यातून एक दिवस ऑनलाइन तबला शिकवितात.

त्यामुळे यज्ञेशच्या वादनात पंजाब घराण्याचा ‘बाज’ जाणवतो. तबल्यातील ज्ञानाच्या दृष्टीने विशारद झालेल्या वादकांच्या क्षमतेचे त्याचे वादन आहे. मात्र, वयाने लहान असल्यामुळे तो पुढच्या परीक्षा देऊ शकत नाही. अर्थात, तो पंजाब घराण्याचे वादन शिकतोय, त्यातच सर्व आले.

राष्ट्रीय स्तरीय स्पर्धेत यश

यज्ञेशने आतापर्यंत अनेक राज्य, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होत यश मिळविले आहे. अकोला येथे झालेली राष्ट्रीय स्पर्धा, जालंधर (पंजाब) येथील राष्ट्रीय स्पर्धा, नागपूर येथे अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या स्पर्धांमध्ये त्याने विजेतेपद, उपविजेतेपद पटकावले आहे.

आता पुढील महिन्यात पुण्यात युनेस्को प्रमाणित सांस्कृतिक संचालनालयाच्या राष्ट्रीय स्पर्धेत तो सहभागी होतोय. यज्ञेश अवघ्या नऊ-दहा वर्षांचा असून, तो कुठल्याही कार्यक्रमात साथसंगत करू शकतो, असे त्याचे वादन आहे.

सॉफ्टवेअर इंजिनिअर व्हायचंय

यज्ञेश विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशीनाथ पलोड स्कूलचा विद्यार्थी. गणित, संस्कृत त्याचा आवडता विषय. तबल्यातच मोठे व्हायचे त्याने ठरवलंय, तरी शैक्षणिक करिअरबाबत विचारले असता तो सॉफ्टवेअर इंजिनिअर होण्याची इच्छा व्यक्त करतो.

भवगतगीतेच्या संस्काराची जोड

रोज दीड-दोन तास तबल्याचा हमखास रियाझ करणारा यज्ञेश फावल्या वेळेत दुष्यंत जोशी यांच्याकडून गायनाचेही धडे घेतोय. संस्कारी आणि गुणी असलेल्या या मुलाकडून श्री. जोशी भगवत्‌गीतातील अध्यायांचे पाठांतर करून घेताय. दोन अध्याय त्याचे तोंडपाठ झालेत. पूर्ण गीतापाठ करण्याचा त्याचा मानस आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती 200 पार; महाविकास आघाडीची मोठी निराशा

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

SCROLL FOR NEXT