Waiter Professor to Kirtankar esakal
जळगाव

Jalgaon News : वेटर, प्राध्यापक ते कीर्तनकार...तरवाडेच्या भूमिपुत्राचा प्रवास; शासकीय नोकरीसाठी दिला मदतीचा हात

हलाखीची परिस्थिती आहे. परंतु शिक्षणाची आस आहे. ही बाब लक्षात घेऊन महामार्गावर असलेल्या एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करून शिक्षण घेतले.

दीपक कच्छवा :सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : हलाखीची परिस्थिती आहे. परंतु शिक्षणाची आस आहे. ही बाब लक्षात घेऊन महामार्गावर असलेल्या एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करून शिक्षण घेतले. विज्ञान शाखेत प्रवेशाची इच्छा असताना पैशांअभावी शक्य झाले नाही म्हणून कला शाखेत प्रवेश घेतला आणि प्राध्यापक झाले.

केवळ स्वतः प्राध्यापक झाले, असे नाही तर आपल्या कमाईतून अनेकांना शिकवले. (From waiter professor to kirtankar journey of Bhoomiputra of Tarwade jalgaon news)

त्यातील १५ जण शासकीय अधिकारी झाले आणि सत्संगाचा मार्ग धरत आता ते वारकरी पंथाद्वारे उत्कृष्ट कीर्तनही करतात. चाळीसगाव - धुळे रस्त्यावर असलेल्या तरवाडेचे रहिवासी व सध्या शिक्रापूर (पुणे) येथे वास्तव्यास असलेले प्राध्यापक कीर्तनकार राहुल पाटील यांची ही चितरकथा आहे. तत्कालीन स्थितीमध्ये त्यांची घरची गरिबीची परिस्थिती असल्यामुळे आपल्याला वेगवेगळे काम करावे लागले, ही बाब त्या काळात सर्वसामान्य होती.

मात्र एका हॉटेलमध्ये वेटरचे काम केले. त्यातून मिळणाऱ्या पैशातून शिक्षण घेतले. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा होता. मात्र पुरेसे पैसे नसल्यामुळे आर्ट शाखेत प्रवेश घ्यावा लागला. त्यातून बी.ए. केले नंतर ‘बीएड्’साठी प्रयत्न केला. मात्र तेथे पुरेसे पैसे नसल्यामुळे अखेर ‘एमए’ला ॲडमिशन घेतली त्यातही यश मिळाले आणि यथावकाश प्राध्यापक झाले वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक आहेत.

प्रा. राहुल पाटील यांनी आतापर्यंत अनेकांना शिकवले. पैशांअभावी आपले शिक्षण खंडित झाले, ही बाब लक्षात घेऊन शिकणाऱ्याला शिकविले पाहिजे, ही स्वतःभोवती निर्माण केलेली आदर्श गाथा त्यांनी पुढे चालविली. त्यामुळे अल्प मोबादल्यात त्यांनी पंधराहून अधिक जणांना शिकविण्याचे काम करायचे. मात्र यातील सर्व आजही शासकीय सेवेत रुजू झाले अजून ते सर्वजण प्रा. राहुल पाटील यांना मानाचे स्थान देतात.

हे करत असतानाच त्यांचा ओढा हा वारकरी पंथाकडे होता. त्यातून त्यांनी हरिनाम कीर्तन करणे सुरू केले. कीर्तनाच्या बिदाकीपेक्षा आपण त्या भागात काहीतरी सत्कर्म करतो, याची त्यांना जाण आहे म्हणून ते अनेक ठिकाणी कीर्तनात जातात. स्वतः कीर्तन करतात तसेच त्या भागामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा, आरोग्य चांगले राहावे. व्यसनापासून लोकांनी दूर राहावे, याचा प्रचार प्रसार करत असतात. त्यासाठी कोणीही त्यांना ‘ॲम्बेसिडर’ केलेले नाही. मात्र हे आपण समाजाचे उत्तरदायित्व लागतो, या हेतूने ते करतात.

रात्री काम, दिवसा शिक्षण

राहुल पाटील पुणे येथे शिकत असताना रात्र काळात त्यांनी नोकरी केली आणि स्वतःच्या पायावर शिक्षण केले. अनेकांनी तसे शिकावे, यासाठी ते प्रयत्न करीत असतात. त्यांच्या या कार्याला परिसरातून सकारात्मक प्रतिसाद मिळतो आणि हे आमच्या गावचे आहेत. आमच्या भागातले आहेत, असेही सांगतात. ज्यावेळी पंढरपूर, आळंदीसाठी दर्शनाला खानदेशातून वारकरी जातात, त्यावेळी ते त्यांची व्यवस्था देखील मनापासून करतात. ते विठ्ठल सेवा समजून ही सेवा करीत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन पाटील 13327 मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT