fund esakal
जळगाव

Jalgaon News : संत मुक्ताई मंदिरासाठी अडीच कोटींचा निधी

सकाळ वृत्तसेवा

मुक्ताईनगर (जि. जळगाव) : तालुक्यातील कोथळी येथील संत मुक्ताई मंदिरया तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यातील कामास २ कोटी ५४ लाख रुपये निधी (Funding) वितरीत करण्यात येणार आहे. यामुळे मंदिराच्या कामाला गती येणार आहे. (Funding of 2 5 Crores for Sant Muktai Temple jalgaon news)

यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आलेले आहे.

ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत राज्यातील ग्रामीण तीर्थक्षेत्रांना निधी वितरीत करण्यासाठी २०२२-२३ या आर्थिक वर्षात भरीव निधी अर्थसंकल्पीत करण्यात आला आहे. या तरतुदीतून श्री संत मुक्ताई मंदिर, कोथळी या तीर्थक्षेत्रातील विकास कामांसाठी उर्वरित २ कोटी ५३ लाख ६७ रुपये इतका निधी जिल्हाधिकारी यांना वितरीत करण्यात येत आहे.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नास यश आले असून, वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेले आदिशक्ती संत मुक्ताई मंदिराचे रखडलेले काम पूर्णत्वास जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निधी वितरित झाल्याची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांचे स्वीय सहायक प्रवीण चौधरी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT