मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : चाळीसगाव तालुक्यात दोन वेगवेगळ्या अपघातांत भावी नवरदेवासह सहा महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या महिलेचा मृत्यू झाला तर या महिलेचा पती गंभीर जखमी झाला. या दोन्ही घटनांमुळे पातोंडा व जामदा गावावर शोककळा पसरली आहे.
जामदा (ता. चाळीसगाव) येथील मोहन भाईदास सोनवणे (वय २३) हा मेहुणबारे येथून ट्रॅक्टर घेऊन जात असताना त्याचे ट्रॅक्टर ट्रालीसह उलटले. त्यात मोहन हा ट्रॅक्टरखाली दाबला गेल्याने जागीच ठार झाला. (Future Groom and six months married women death in two different accidents jalgaon news)
मृत मोहन सोनवणे याचा नुकताच साखरपुडा होऊन १० जानेवारीला त्याचा विवाह होणार होता. घरात विवाहाची तयारी सुरू असल्याने आनंदी वातावरण होते. मात्र अंगाला हळद लावण्यापूर्वीच क्रूर काळाने या तरुणाला हिरावून नेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पत्नी ठार, पती जखमी
दुसऱ्या घटनेत पातोंडा येथील विवाहितेचा मृत्यू झाला. चाळीसगाव-भडगाव रस्त्यावर गुरुवारी (ता. २९) पहाटे पाचच्या सुमारास पातोंडा गावाजवळ वळणारवर हा अपघात झाला. पातोंडा येथील उमेश रघुनाथ रोकडे व त्याची पत्नी प्रियंका उमेश रोकडे (वय २२) हे दाम्पत्य नाशिक येथे जाण्यासाठी पहाटे आपल्या दुचाकीवरून चाळीसकडे जाण्यास निघाले.
हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....
नाशिक येथे चाळीसगाव येथून सेवाग्राम एक्स्प्रेसने जाण्यासाठी दुचाकीने जात असताना पातोंडा गावाजवळ वळणावर समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती, की त्यात दुचाकीवर मागे बसलेल्या प्रियंका रोकडे या दुचाकीवरून फेकल्या जावून जबर मार लागल्याने जागीच ठार झाल्या तर त्यांचे पती उमेश रोकडे हे गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर अज्ञात वाहन पळून गेले. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी धाव घेऊन दोघांना चाळीसगावी नेले. मात्र प्रियंका रोकडे यांचा मृत्यू झालेला होता. तर गंभीर जखमी उमेश रोकडे यांना खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.