जळगाव : येथील नेरीनाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी वर्षभरापूर्वी केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे गॅसवर चालणारी शवदाहिनी सुरू केली. वर्षभरात तब्बल ४५३ मृतदेहांवर गॅस शवदाहिनीद्वारे अंत्यसंस्कार झाले. गॅसचा उपयोग शवदहनासाठी केल्याने तब्बल तीनशे वृक्ष जाळण्यापासून वाचविण्यात आले. सोबतच २ कोटी ५१ लाख ८५ हजार लीटर ऑक्सिजन निर्मितीची प्रक्रिया तीनशे वृक्ष जाळून बंद होणार होती. ऑक्सिजन निर्मितीला बसणारा ब्रेक गॅस शवदाहिनीमुळे बसला नाही.
लाकडे जाळून वातावरणात जाणारा विषारी कार्बनडाय ऑक्साईड गॅस शवदाहिनीमुळे अंत्यसंस्कारासाठी तयार झाला नाही. यामुळे शहराचे वातावरण प्रदूषणमुक्त होण्यास मदत झाली आहे. येथील केशवस्मृती प्रतिष्ठानने ३१ जानेवारी २०२१ ला नेरीनाका येथील स्मशानभूमीत गॅस शववाहानी उभारली. हा काळ दुसऱ्या कोरोना लाटेचा होता. पहिल्या लाटेत बाधीत होऊन रोज मृत्यूची संख्या अधिक होती. स्मशानभूमीतील अंत्यसंस्कारासाठी असलेले ओटेही अंत्यसंस्कारासाठी अपूर्ण पडत होते. मृतदेहावर अंत्यसंस्कार खाली जमिनीवर केले जात होते. यामुळे केशव स्मृती प्रतिष्ठानने गॅस शवदाहिनी उभारण्याचा संकल्प केला. यामुळे दीड तासात एका मृतदेहावर अंत्यसंस्कार होवून मृताच्या अस्थी शिल्लक राहतात. लागलीच दुसऱ्या मृतदेहावर अंत्यसंस्कार गॅस शवदाहिनीत केले जातात. गॅस शवदाहिनीद्वारे किमान दहा ते बारा मृतदेहांवर अंत्यसंस्कार होतात. यामुळे प्रदूषण टळते. लाकडाची कत्तल थांबते, पर्यावरणाचे रक्षण होते. ही बाब लक्षात घेऊन गॅस शवदाहिनी प्रथमच तयार केली. वर्षभरात ४५२ मृतदेहांवर त्याद्वारे अंत्यसंस्कार झाले. तीनशे झाडे कत्तल होण्यापासून वाचली आहेत.
तीनशे झाडे दररोज ६९ हजार लीटर ऑक्सिजन हवेत सोडतात. वर्षभरात तीनशे झाडे २ कोटी ५१ लाख ८५ हजार लीटर ऑक्सिजन निमिर्ती करतात. एवढी झाडे कत्तलीपासून वाचवून पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात संवर्धन शहरात झाले आहे. यामुळे अंत्यसंस्कारावेळी लाकडाऐवजी गॅस शवदाहिनीचा वापर करायला हवाच. अंत्यसंस्कार जर लाकडे वापरून केले तर ३५०० रूपये लागतात. शेणाच्या गोवऱ्याद्वारे अंत्यसंस्कार केले तर ५ ते ६५०० खर्च येतो. गॅस शवदाहिनीद्वारे केवळ पंधराशे खर्च येतो. तेही पर्यावरणाचे संतुलन राखून.
एका मृतदेहासाठी पाच मण लाकूड
मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी अर्धा ते एक झाडाचे (चार ते पाच मण) लाकूड लागते. लाकडे जाळून कार्बनडायऑक्साईड हवेत सोडला जातो. यामुळे वायू प्रदूषण होते. नागरिकांच्या आरोग्यासाठी वृक्षांवर त्याचा दुष्परिणाम होतो.
एक झाड निर्माण करते २३० लिटर ऑक्सिजन
एक झाड लावून ते मोठे होण्यासाठी अनेक वर्ष लागतात. मात्र जाळण्यासाठी केवळ एक ते दीड लागतो. झाडांची कत्तल झाल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडतो. एक झाड दिवसभरात २३० लीटर ऑक्सिजन हवेत सोडते. तेही अगदी मोफत. माणूस रोज ऑक्सिजन श्वासाद्वारे शरिरात घेतो.
प्रत्येकाला रोज ५५० लिटर ऑक्सिजनची गरज
प्रत्येक व्यक्तीला जीवंत राहण्यासाठी दररोज ५५० लिटर ऑक्सिजनची आवश्यकता असते. श्वासाच्या माध्यमातून हा ऑक्सिजन आपण घेतो. श्वासाच्या माध्यमातून जी हवा फुफ्फुसामध्ये घेतो. त्यात २० टक्के ऑक्सिजन असतो. याचा अर्थ एखाद्या व्यक्तीला जिवंत राहण्यासाठी कमीत कमी तीन मोठ्या झाडांची आवश्यकता असते.
गॅस शवदाहिनीद्वारे पर्यावरणाचा समतोल राखला गेला आहे. अनेक झाडांची कत्तल थांबली आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी गॅस शवदाहिनीचा वापर अंत्यसंस्कारावेगळी वाढविण्याची गरज आहे.
- नंदू अडवाणी, प्रकल्पप्रमुख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.