Gas pump seized from Gendalal Mill by city police. esakal
जळगाव

Jalgaon News : गेंदालाल मिलमधील गॅस पंप जप्त; कारवाईत वगळलेली रिक्षा मिळेना

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेंदालाल मिलमधील अवैध गॅस पंपावर कारवाई करण्यात आली. जिल्‍हापेठ पोलिसांनी बेकादेशीर घरगुती गॅस सिलिंडरमधून गॅस भरून देणारी रिक्षा कारवाईतून वगळली होती. ‘ती’ रिक्षा शोधण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले असून, रिक्षाचा शोध सुरू आहे. (Jalgaon News)

हेही वाचा : दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

गेंदालाल मिल परिसरातील आश्रमशाळेच्या गल्लीमधील एका दुकानात घरगुती सिलिंडरमधून बेकायदेशीर प्रवासी रिक्षांमध्ये गॅस भरून काळाबाजार करीत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांना मिळाली. त्यांच्या पथकातील उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, भास्कर ठाकरे, उमेश भांडारकर, गजानन बडगुजर, किशोर निकुंभ, उल्का मोरे, अमोल ठाकूर यांनी गेंदालाल मिल परिसरात छापा टाकून १७ हजार रुपयांची गॅस भरण्याची मोटार, पंप व ६ हजारांची तीन सिलिंडर, असा एकूण २३ हजारांचा ऐवज जप्त केला. गॅस भरून देणारा राहुल सुरेश आडके (वय २२, रा. आझादनगर) याला ताब्यात घेतले आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Vidhansabha: विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा 'कलरकोड' प्लॅन, जाणून घ्या आतल्या गोटातील बातमी

Swiggy IPO: स्विगीचा 11,327 कोटी रुपयांचा IPO उघडला; गुंतवणूक करावी का? काय आहे तज्ज्ञांचे मत?

Latest Marathi News Updates live : पुण्यात मित्र पक्षाला एकत्र घेत महायुतीची रणनीती ठरली

IPL Mega Auction 2025: ऋषभ पंत, श्रेयस अय्यर यांच्यासह २३ भारतीय खेळाडू २ कोटींच्या ब्रॅकेटमध्ये; कोणाला हाय डिमांड?

Raj Thackeray: मुंबईत मनसे फॅक्टर ठरणार निर्णायक; बदललेली भूमिका वाढवतेय महायुतीची डोकेदुखी

SCROLL FOR NEXT