Jalgaon News : महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर मंगळवारी (ता. १) महासभा होणार आहे.
अविश्वास ठराव रद्द करण्यासाठी महासभेत ४५ सदस्यांची मंजुरी आवश्यक आहे. ( General Assembly will be held on motion of no confidence filed against Municipal Commissioner Dr Vidya Gaikwad jalgaon news)
सतरा मजली इमारतीच्या सतराव्या मजल्यावरील सभागृहात सकाळी अकराला महासभा होईल. पीठासीन अध्यक्ष म्हणून महापौर जयश्री महाजन असतील. नगरसचिव सुनील गोराणे यांनी महासभेची सूचना जाहीर केली आहे.
त्यात म्हटले आहे, की जळगाव शहर महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्यावरील अविश्वास प्रस्तवाबाबत नगरसेवक अश्विन शांताराम सोनवणे व इतर सदस्यांनी २८ जुलैला दिलेल्या प्रस्तावावर निर्णय घेण्यात येणार आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
दरम्यान, आयुक्तांवरील अविश्वास ठराव मागे घेण्याबाबत राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील व भाजप नगरसेवकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चर्चा झाली आहे. प्रस्ताव मागे घेण्यात येणार आहे.
मात्र, त्यासाठी महासभा घ्यावीच लागणार आहे. याबाबत महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले, की महासभेत किमान ४५ सदस्यांचा कोरम आवश्यक आहे. अविश्वाचा प्रस्ताव रद्द करण्यासाठी एकमताने किंवा बहुमताने प्रस्ताव मान्य करून ठराव मंजूर करावा लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.