जळगाव : केंद्र शासनाने पंतप्रधान योजनेंतर्गत मोफत मिळणारे धान्य आता रेशनकार्डधारकांना मिळणार नाही. त्याऐवजी ‘राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील’ लाभार्थ्यांना या महिन्यापासून (जानेवारी) मोफत धान्य मिळेल. एकूण २७ लाख ३४ हजार ९०९ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल.
हेही वाचा: योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त
अंत्योदय अन्नयोजना, प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत रेशनकार्ड असलेल्या लाभार्थ्यांना हा लाभ मिळेल. अंत्योदय योजनेंतर्गत एक लाख ३४ हजार ९९ हजार कार्डधारक आहेत, तर प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत चार लाख ८९ हजार २८७ कार्डधारक आहेत. त्याचे लाभार्थ अनुक्रमे पाच लाख ८४ हजार २० व २१ लाख ५० हजार ८८९ आहेत.
या लाभार्थ्यांना मोफत धान्य मिळेल. अंत्योदय योजनेंतर्गत प्रतिकार्ड ३५ किलो धान्य मिळत होते, तर प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत प्रतिमाणसी तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ मिळत होता. याचा दर तांदूळ तीन व गहू दोन रुपयांना मिळत होता.
कोरोनापासून पंतप्रधान योजनेंतर्गत मिळणारे धान्य डिसेंबर २०२२ पासून बंद करण्यात आले. आता या शिधापत्रिकाधारकांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम अंतर्गत अंत्योदय योजना व प्राधान्य कुटुंब योजनेचे विकतचे मिळणारे धान्य या महिन्यापासून मोफत दिले जाणार आहे. यामुळे नागरिकांना या धान्याच्या मोबदल्यात पैसे देण्याची आवश्यकता नाही.
लाभार्थ्यांनी या धान्याची पावती रेशन दुकानदाराकडून घ्यावी, काही तक्रार असल्यास तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग, जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
तालुकानिहाय लाभार्थी असे...
तालुका--अंत्योदय योजना लाभार्थी...प्राधान्य कुटुंब योजना लाभार्थी
अमळनेर--३७८६४--१७९३३३
भडगाव--३१७४०--८०५३२
भुसावळ--१८५९३--१४७७९४
बोदवड--१६०४५--४७८६२
चाळीसगाव--७८९१९--१९५३३४
चोपडा--४३६१४--१७४९३५
धरणगाव--३१६६४--९८१०६
एरंडोल--२७०६२--८५७४६
जळगाव--५०९००--२८०१००
जामनेर--४७७४८--१९५४७७
मुक्ताईनगर--३५७४४--८९८७३
पाचोरा--४०९९४--१५९३६३
पारोळा--३०३९३--१०२८३८
रावेर--४६८८२--१८३०००
यावल--४५८५८--१३०५९५
एकूण--५८४०२०--२१५०८८९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.