Uddhav Thackeray Eknath Shinde  esakal
जळगाव

Shinde Vs Thackeray : नाव चिन्ह मिळाल्यानंतर शिवसेनेचे मिशन इनकमिंग होणार सुरू....

देवीदास वाणी

Jalgaon News : निवडणूक आयोगाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला ‘शिवसेना’ नाव (Shinde Vs Thackeray) व धनुष्यबान चिन्ह मिळाल्यानंतर जिल्ह्यातील शिंदे गटाने मोठा जल्लोष केला. (getting name and symbol of shivsena now shinde group working on how workers of Thackeray group will come to them jalgaon news)

या निर्णयाने आत्मविश्‍वास वाढलेला शिंदे गट जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी सज्ज होत आहे. राज्यात गेल्या वर्षी जूनमध्ये घडलेल्या सत्तांतरानंतर जळगाव जिल्ह्यातही शिवसेनेचे सरळ ध्रुवीकरण झाले.

सर्व विद्यमान आमदार शिंदे गटात असल्याने स्वाभाविकच जिल्ह्यात शिंदे गटाचा प्रभाव अधिक आहे. तरीही कार्यकर्त्यांची फळी उद्धव ठाकरे गटाकडे असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शिंदे गटाचे शिलेदार आता ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्याकडे कसे येतील, यावर काम करत आहेत.

आतापर्यंत हजारावर कार्यकर्ते शिंदे गटात

आतापर्यंत सुमारे हजार पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश करवून घेतला आहे. धरणगाव तालुक्यातील नगराध्यक्षांसह ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आपल्या गळाला लावले आहेत. जळगाव महापालिकेतील अनेक नेतेही शिवसेनेत येण्याच्या तयारीत आहेत. अर्थात, ते निवडणुकीच्या तोंडावरच प्रवेश करण्याची शक्यता अधिक आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

मुख्यमंत्र्यांचा दोनदा दौरा

राज्यातीत सत्तांतर होऊन शिंदे गट-भाजपची सत्ता आल्यानंतर जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोनवेळा दौरा केला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपली ताकद यानिमित्त जिल्ह्यावासीयांना दाखविली.

मुख्यमंत्री शिंदे यांचा राज्यातील कार्याचा वाढता आलेख, पालकमंत्री पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात झालेली व होत असलेली कामे पाहता, इतर पक्षांतील नाराज पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेची वाट धरल्याचे चित्र आहे.

‘जिल्हाप्रमुख आपल्या दारी’ संकल्पना

शिवसेना जिल्हाप्रमुख नीलेश पाटील यांनी उपजिल्हा प्रमुख, तालुकाप्रमुखांसह इतर पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन ‘जिल्हाप्रमुख आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम राबवून जिल्हा परिषद गटनिहाय दौरा केला आहे. इतर पक्षांतील नाराज पदाधिकाऱ्यांना शिवसेनेत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात त्यांना यशही आले आहे.

या दौऱ्यात त्यांनी गट, गणातील नागरिकांना मुख्यमंत्री शिंदे, पालकमंत्री पाटील यांच्या विकासकामांची यशोगाथा सांगून शिवसेनेला सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तेथील सरपंच, उपसरपंच, इतर पदाधिकारी व प्रतिष्ठितांसेाबत बैठका घेऊन घराघरांत शिंदेची शिवसेना पोचविली आहे. गावागावांत शिवसेना पदाधिकाऱ्यांचे मेळाव घेऊन शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे.

सोबतच आगामी निवडणुकीत कोणाला संभाव्य उमेदवारी देता येईल, त्या उमेदवाराची इत्यंभूत माहितीही गोळा करण्याचे काम सुरू आहे. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी भाजप मेळाव्यात राज्यात सत्ता मिळविण्यासाठी शिंदे गटाने भाजपला मदत केली.

यामुळे आपण सत्तेत आलो. राज्यात भाजप-शिंदे गट एकत्र आहे. तोच फार्म्युला सर्वच निवडणुकांमध्ये वापरण्यात येईल, असे संकेत दिलेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समिती, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिकांच्या निवडणुका एकत्रित लढविल्या जाणार असल्याचे चित्र आहे.

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्यात, जिल्ह्यात विकासकामांची गंगा आणली आहे. त्यांचे काम गटागटांत पोचवत, ‘जिल्हाप्रमुख आपल्या दारी’ ही संकल्पना प्रथमच राबविली आहे. शिवसेनेचे चार आमदार आहेत. आगामी काळात जिल्ह्यात शिवसेना ‘नंबर वन’ पक्ष करण्यावर आपला भर असेल." -नीलेश पाटील, जिल्हाप्रमुख, शिवसेना (शिंदे गट)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT