Minister Girish Mahajan during the toss of the match here on Saturday.  esakal
जळगाव

Girish Mahajan News : जळगावची कामगिरी कल्पनेपलीकडची : गिरीश महाजन

सकाळ वृत्तसेवा

Girish Mahajan News : राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन आणि समापन करून जळगाव होमिओपॅथी महाविद्यालयाने सर्वोच्च मानाचा दीपस्तंभ निर्माण केल्याचा सार्थ अभिमान आम्हाला असून, जळगावची ही कामगिरी खरोखरच कल्पनेपलीकडची असल्याचे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केले.

महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ महोत्सवाच्या अनुषंगाने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक संलग्न महाविद्यालयांची राज्यस्तरीय आंतरविभागीय निवड चाचणी स्पर्धेचा समारोप शनिवारी (ता. १४) झाला. त्याप्रसंगी मंत्री महाजन बोलत होते. (Girish Mahajan statement about jalgaon State level sports tournament news)

या वेळी राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. मिलिंद निकम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगावचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभिजित अहिरे, अधिष्ठाता शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालय डॉ. अविनाश महाजन, विद्यार्थी कल्याण विभाग आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मनोजकुमार मोरे, डॉ. राजेश इस्ते, डॉ. बाळासाहेब पेंढारकर, स्पर्धेचे समन्वयक डॉ. रितेश पाटील, डॉ. अर्चना काबरा, आरती चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रसंगी खेळाडूंना मार्गदर्शन करताना महाजन यांनी निर्व्यसनी आयुष्य जगण्याचा मूलमंत्र दिला. तसेच नियमित व्यायाम व सात्त्विक आहार घेण्याचे आवाहन केले.

प्र. कुलगुरू डॉ. निकम यांनी स्पर्धांच्या आयोजकांचे आणि पर्यायाने जळगाववासीयांचे आभार व्यक्त करत आमच्या अपेक्षापेक्षा अधिक सुरेख कामगिरी बजावल्याचे कौतुक केले. मान्यवरांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना गौरविण्यात आले.

राज्यस्तरीय स्पर्धेतील विजयी संघ आता राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करतील. राष्ट्रीय स्पर्धेत देखील खेळाडू विजयश्री खेचून आणतील, असा विश्‍वास देखील मान्यवरांनी व्यक्त केला. या वेळी पंच व सामनाधिकारी यांचे प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आले. डॉ. अभिजित अहिरे यांनी प्रास्ताविक, डॉ. मनोज विसपुते यांनी सूत्रसंचालन केले. गणेश वाघ यांनी आभार मानले.

आयोजकांचा विशेष सत्कार

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाचा विषय समोर आला त्या वेळी जळगावच्या होमिओपॅथी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने समन्वयक डॉ. रितेश पाटील, डॉ. गिरीश ठाकूर यांनी आवर्जून जळगावसाठी स्पर्धा मागून घेतल्या.

त्या वेळी अवघे वर्ष ते दीड वर्षे होत आलेल्या महाविद्यालयाला यजमानपद देण्यासाठी सदस्यांचे एकमत होत नव्हते. मात्र, जिद्दीने ते मिळवून ‘ना भूतो ना भविष्य’ असे स्पर्धेचे यशस्वी आयोजन करून वैद्यकीय क्षेत्रात जळगावचे नाव अंकित केले. त्यासाठी डॉ. रितेश पाटील यांचा विशेष सत्कारही करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

Memorable Trip Ideas: लग्नाआधीची तुमची ट्रीप स्मरणीय करायची आहे? मग 'असे' नियोजन करून पहा

Narayana Murthy: UPSC परीक्षेतून नव्हे तर अशा पद्धतीने करा IAS-IPSची निवड; नारायण मूर्तींनी PM मोदींना केले आवाहन

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची अचानक एक्झिट; आता 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

Uddhav Thackeray Mumbai: ठाकरेंचा गड खालसा करण्यात येणार का भाजपला यश? मोदी शहांसह डझनभर मंत्री मुंबईत

SCROLL FOR NEXT