Girish mahajan Statement about Eknath Khadse esakal
जळगाव

Girish Mahajan Statement : एकनाथ खडसेंना नाटक करण्याची गरज नव्हती

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : ज्याच्या विरोधात तक्रार आहे, त्यांचे जाबजबाब घेतल्यानंतर सर्व गोष्टी समोर येतीलच, त्यामुळे पाच-सहा दिवस वाट बघायला हवी. त्यासाठी गुन्हा नोंदवून घेण्यासाठी एवढे नाटक करण्याची एकनाथ खडसे यांना गरज काय, असा टोला ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी लगावला. दूध संघाच्या गैरव्यवहारप्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार आहोत, असे मतही त्यांनी व्यक्त केले. जळगाव येथे पत्रकारांशी ते बोलत होते.

जिल्हा दूध संघातील चोरी, अपहार प्रकरणी गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी एकनाथ खडसे यांनी तब्बल नऊ ते दहा तास शहर पोलिस ठाण्यात आंदोलन केले. यावर बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले, की भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी दूध संघातील गैरव्यवहाराबाबत सुरवातीला तक्रार दिली. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांना सुचले आणि त्यांनी तक्रार दाखल केली. पोलिस चौकशी करत असतानाही गुन्हा नोंद करण्यासाठी त्यांचे नाटक सुरू आहे.(Girish Mahajan Taunting Statement Eknath Khadse did not need to play Drama Jalgaon political News)

जिल्हा दूध संघातून एक ते दोन कोटी रुपयांचा एवढा माल बाहेर गेलाच कसा, असा प्रश्न उपस्थित करून मंत्री गिरीश महाजन म्हणाले, की दूध संघाचे अध्यक्ष तसेच कार्यकारी संचालक यांच्या संमतीशिवाय ते होऊ शकत नाही. त्यामुळे ज्यांच्या विरोधात तक्रार आहे, त्यांच्या जाबजबाबानंतर सर्व गोष्टी समोर येतील. पाच-सहा दिवस वाट बघायला हवी होती, सर्व समोर येणारच आहे.

त्यासाठी एवढे नाटक करण्याची कोणतीही गरज नव्हती. गेल्या महिन्यांत दूध संघात ५२५ रुपये भावाचे तूप ९५ रुपये दराने विक्री करण्यात आले, ती तक्रार आमच्या आमदारानेच केली, ते सिद्ध झाले, यात काही जणांना निलंबित करण्यात आले.

अशा पद्धतीने दूध संघात सर्व ठिकाणी गैरव्यवहार चालला आहे, भ्रष्टाचार आणि गडबड चालली आहे, याची चौकशी पोलिसांमार्फत नाही तर एसआयटीमार्फत करावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे करणार आहोत. त्या चौकशीतून अनेक गोष्टी समोर येतील, असे या वेळी मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT