Increased water storage of the dam: Girna Dam Water Level esakal
जळगाव

Jalgaon News: गिरणा धरण पन्नाशीच्या उंबरठ्यावर! शेती सिंचनाला फायदा

सुधाकर पाटील

Jalgaon News : निम्म्या जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून असलेल्या गिरणा धरणाची पन्नाशीकडे वाटचाल सुरू आहे.

गेल्या चोवीस तासांत तब्बल दहा टक्के एवढी घशघशीत वाढ झाली आहे. त्यामुळे रात्री नऊपर्यंत गिरणा धरणात ४८.८५ टक्के एवढा पाणीसाठा नोंदविला गेला. (Girna Dam on the threshold of fifty Agricultural irrigation benefits Jalgaon News)

नाशिक जिल्ह्यात चार दिवसांपासून विशेषत: धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वरूणराजाने जोरदार हजेरी लावल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आला. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

धरणात ४९ टक्के साठा

गिरणा धरणात पाणलोट क्षेत्रातील धरणातून शुक्रवारी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्याने धरणाच्या टक्केवारीचा फलक आज दिवसभर हलता राहिला. शुक्रवारी सायंकाळी सहाला धरणात ३७ टक्के एवढा पाणीसाठा होता.

चोविस तासात या पाणीसाठ्यात तब्बल ११ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे धरणाचा पाणीसाठा हा आज सायंकाळी सहाला ४८ टक्के नोंदला गेला. धरणात ९ हजार ४९४ दशलक्ष घनफुट एवढा उपयुक्त पाणीसाठा झाल्याचे गिरणा पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता एस. आर. पाटील यांनी सांगीतले.

पाण्याची आवक मंदावली

गिरणा धरणात पाणलोट क्षेत्रातील धरणातून शुक्रवारी रात्री ५० हजार क्यूसेसने पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे रात्रीतून सकाळी सहापर्यंत धरणात ९ टक्के वाढ झाली. त्यानंतर दुपारी बारापर्यंत धरणाची टक्केवारी जोरात वाढली.

मात्र बारानंतर धरणाचा आकडेवारीचा टक्क्याचा वेग मंदावली. दुपारी बाराला ४९.७९ टक्के पाणीसाठा होता. पुढच्या सहा तासात त्यात फक्त दोन टक्के वाढ पाहायला मिळाली. तर सायंकाळी सहाला पाणलोट क्षेत्रातील धरणातून ८ हजार ८३१ क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू होता.

मात्र वरच्या धरणाचा फ्लो अजून कमी झाल्याने काही वेळाने हा फ्लो ७ हजार ८३ एवढा होणार होता. त्यामुळे वरच्या धरणातून आवक मंदावली आहे. पर्यायाने धरणाच्या पाणीसाठ्याची वाढ मंदावलेली पहायला मिळाली.

दरम्यान गिरणा धरणात तिन दिवसात मोठ्याप्रणात वाढ झाल्याने निम्म्या जळगाव जिल्ह्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. धरणावर चाळीसगाव पाचोरा, भडगाव पालिकासह १५८ पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत.

तर पन्नासी गाठल्यास गिरणा पट्ट्याच्या रब्बीच्या ही आशा पल्लवित होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे आज गिरणा पट्ट्यात शेतकऱ्यांमध्ये आनंद पाहायला मिळाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सायंकाळी सहा वाजता पाणलोट क्षेत्रातील धरणातुन होणारा विसर्ग ( क्युसेस)

धरण............विसर्ग........टक्केवारी

#चणकापुर........४५५०.........९२.४६

#पुनद..........१२६३...........९२

#केळझर........१६८२...........१००

#हरणबारी .....२५८८............१००

दिवसभरात टक्केवारी कशी वाढली

@सकाळी ६ वाजता.......४३.८१

@सकाळी ९ वाजता........४५.६१

@दुपारी १२ वाजता........४६.७२

@दुपारी ३ वाजता..........४७.६१

@सायंकाळी ६ वाजता.....४८.३२

@रात्री ९ वाजता........४८.८५

गिरणा धरण दृष्टीक्षेपात

#धरणाची क्षमता...२१५०० दशलक्ष घनफुट

#धरणाचा मृतसाठा..३००० दशलक्ष घनफुट

# उपयुक्त जलसाठा...१८५०० दशलक्ष घनफुट

#एकुन लाभक्षेत्र... ६९००० हेक्टर

#जळगाव जिल्हातील एकुन लाभक्षेत्र....५७२०९ हेक्टर

# जलसिंचनाचे फायदे मिळणारे तालुक्याची संख्या...०८

# धरणावर अवलंबून पाणीपुरवठा योजना...१५८ ग्रामीण व चार पालिकेच्या योजना

"धरणात २४ तासात ११ टक्केपर्यंत वाढ झाली. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. असाच फ्लो सुरू राहिल्यास धरणात पाणीसाठा वाढण्यास मदत होईल."-देवेंद्र अग्रवाल, कार्यकारी अभियंता गिरणा पाटबंधारे जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT