Guardian Minister Gulabrao Patil consoling the parents of the victim esakal
जळगाव

Gondegaon Crime Case: जलदगती न्यायालयात चालणार खटला; गोंडगावला भेटीनंतर पालकमंत्र्यांची ग्वाही

सकाळ वृत्तसेवा

Gondegaon Crime Case : गोंडगाव (ता. भडगाव) येथील घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. पीडित बालिकेला न्याय मिळण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवून एक महिन्याच्या आत निकाल लावण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही राज्याचे पाणीपुरवठा तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी (ता. ६) येथे दिली.

श्री. पाटील यांनी रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पीडित कुटुंबाची भेट देऊन सांत्वन केले, त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. (Gondegaon Crime Case Guardian Minister gulabrao patil testimony after visiting Gondgaon Trial to be held in fast track court jalgaon)

आमदार किशोर पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती विकास पाटील, तालुकाप्रमुख संजय पाटील, शहरप्रमुख अजय चौधरी, सहकार सेलचे तालुकाप्रमुख युवराज पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार पाटील, पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, स्थानिक ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, की पीडितेच्या कुटुंबाचे शासनातर्फे पुनर्वसन करण्यात येईल, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन बांधील आहे.

आठ दिवसांच्या आत या घटनेत आरोपपत्र दाखल करीत हा गुन्हा फास्टट्रॅक न्यायालयात चालवून महिनाभरात निकाल लावण्यात येईल. शासन कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कुटुंबास लवकरात लवकर घरकुल योजनेचा लाभही देण्यात येईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पालकमंत्र्यांचा ‘एसपीं’ना कॉल

पालकमंत्र्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधाला. घटनेनंतर आरोपीला अटक करून घेऊन जाताना गावकऱ्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त झाली होती. पोलिस व्हॅनवर दगडफेकीची घटना झाली होती.

यावर पोलिसांनी चार ते पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहेत, ते मागे घेण्यात यावेत, अशा सूचना पालकमंत्री पाटील यांनी पोलिस अधीक्षकांना केल्या. पालकमंत्र्यांनी पीडित कुटुंबास ५० हजारांची आर्थिक मदतही केली.

खटला जलदगतीने चालणार

बालिकेवरील अत्याचार आणि खुनाचा खटला जलदगतीने न्यायालयात चालविण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी बोलताना सांगितले.

पोलिस पुढील सहा ते सात दिवसांत आरोपपत्र दाखल करणार आहेत. त्यानंतर जलदगती न्यायालयात हा खटला चालविला जाईल. त्यामुळे बालिकेला लवकरच न्याय मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: ठाण्यात पोस्टल मतमोजणी सुरु; एकनाथ शिंदे आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वडाळ्यातून भाजपचे कालिदास कोळमकर ५६५६ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT