election esakal
जळगाव

Graduate Constituency Election : मतदानासाठी जांभळ्या रंगाच्या स्केचपेनचाच वापर करा

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक सोमवारी (ता. ३०) आहे. सकाळी आठ ते दुपारी चारपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी मतदान करताना मतदारांनी मतपत्रिकेसोबत पुरविण्यात आलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केचपेनचाच वापर करावा.

इतर कोणताही पेन, पेन्सिल, बॉल पॉइंट पेन किंवा अन्य साहित्यांचा वापर करू नये, असे जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी अमन मित्तल यांनी सांगितले. (Graduate Constituency Election Use purple sketch pen only for voting one proof of identity is mandatory jalgaon news)

निवडणुकीसाठी मतदान हे पसंतीक्रमानुसार असल्याने पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात १ हा अंक लिहून मतदान करावे, १ हा अंक फक्त एकाच उमेदवाराच्या नावासमोर लिहावा. यापुढील पसंतीक्रम जसे २,३,४… नोंदविणे ऐच्छिक आहे.

जेवढे उमेदवार निवडणूक लढवीत आहेत त्या सर्वांचे संख्येइतके पसंतीक्रम मतदारास नोंदविता येतील. मतपत्रिकेवर नमूद करावयाचा पसंतीक्रम केवळ अंकांमध्ये व एकाच भाषेत (देवनागरी, इंग्रजी, रोमन किंवा राज्य घटनेतील आठव्या परिशिष्टामध्ये नमूद कोणतीही इतर भारतीय भाषा) नमूद करावयाचा आहे.

(उदा. १,२,३,४,५ किंवा 1,2,3,4,5 किंवा I,II,III,IV,V) असा पसंतीक्रम नोंदवावा. शब्दात (एक, दोन, तीन...) असे लिहू नये. आपल्या पसंतीच्या उमेदवारापुढे ‘X’ किंवा ‘√’ अशी खूण करू नये. मतपत्रिकेवर नाव, कोणताही शब्द, सही, अंगठा करू नये, असेही सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मित्तल यांनी कळविले आहे.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

दहा कागदपत्रे पुरावे ग्राह्य धरणार

या निवडणुकीसाठी या मतदानासाठी मतदारांना मतदान केंद्रावर त्यांच्या मताधिकार वापरण्यासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्र सादर करावे लागणार आहे. मात्र, जे मतदार त्यांचे मतदार छायाचित्र ओळखपत्र (ईपीआयसी) सादर करू शकणार नाहीत त्यांनी आधारकार्ड, वाहनचालक परवाना, पॅनकार्ड, भारतीय पारपत्र, केंद्र, राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले फोटोसह सेवा ओळखपत्र, खासदारांना/आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, संबंधित शिक्षक आणि

पदवीधर मतदारसंघातील मतदार ज्या शैक्षणिक संस्थेत काम/नोकरी करीत आहेत त्या शैक्षणिक संस्थांनी जारी केलेले सेवा ओळखपत्र, विद्यापीठाद्वारा वितरित मूळ पदवी/पदविका प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले शारीरिक दिव्यांगत्वाचे मूळ प्रमाणपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने वितरित केलेले युनिक डिसॅबिलीटी ओळखपत्र (यूडीआयडी) आदी सादर करून मतदान करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT