NMU Election esakal
जळगाव

NMU Senate Election : ‘सिनेट’ च्या मतदानाकडे पदवीधरांची पाठ

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर नोंदणीकृत पदवीधरांमधून निवडून द्यावयाच्या दहा जागांसाठी रविवारी २७ मतदान केंद्रांवर सरासरी ४९ टक्के मतदान झाले. निवडणुकीच्या रिंगणातील दोन्ही आघाड्यांनी प्रचार करूनही पदवीधरांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले.

दहा जागांसाठी २७ उमेदवार रिंगणात आहेत. खुल्या संवर्गात पाच जागांसाठी ११ उमेदवार, इतर मागास संवर्गात एका जागेसाठी तीन उमेदवार, अनुसूचित जाती संवर्गात एका जागेसाठी चार उमेदवार, अनुसूचित जमाती संवर्गात एका जागेसाठी दोन उमेदवार, विमुक्त जाती/भटक्या जमाती संवर्गात एका जागेसाठी तीन उमेदवार आणि महिला संवर्गात एका जागेसाठी चार उमेदवार रिंगणात होते. (Graduates to Senate Election forty Nine percent voter turnout in NMU election Jalgaon News)

निम्मेही मतदान नाही

एकूण २२ हजार ६६३ मतदारांची नोंदणी झाली होती, त्यापैकी ११ हजार १३९ मतदारांनीच हक्क बजावला. जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यांतील २७ मतदान केंद्रांवरील ६० बूथवर एकूण सरासरी ४९ टक्के एवढे मतदान झाल्याची आकडेवारी सायंकाळपर्यंत प्राप्त झाली. सर्वत्र मतदान शांततेत झाले.

कुलगुरूंची केंद्रस्थळी पाहणी

सकाळी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी भुसावळ येथील पी. ओ. नहाटा महाविद्यालय, जळगाव शहरातील मुळजी जेठा महाविद्यालय आणि विद्यापीठातील प्रशासकीय इमारतीमधील मतदान केंद्राना भेट देऊन पाहणी केली.

प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांनी एरंडोल, पारोळा, धुळे, शिरपूर, अमळनेर येथील मतदान केंद्रांना, तर कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विनोद पाटील यांनी जामनेर, भडगाव, पाचोरा, चाळीसगाव, जळगाव येथील मतदान केंद्राना भेटी देऊन मतदानाचा आढावा घेतला. वित्त व लेखाधिकारी सीए रवींद्र पाटील यांनी धरणगाव, अमळनेर, शिंदखेडा, दोंडाईचा, नंदुरबार, साक्री येथील केंद्रांना भेटी दिल्या. नऊ विभागीय अधिकारी, आठ क्षेत्रीय अधिकारी, ६० केंद्राध्यक्ष आणि ३७० मतदान अधिकारी व मतदान सेवक यांनी या निवडणूक प्रक्रियेत भाग घेतला.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

बुधवारी मतमोजणी

बुधवारी (ता. १) विद्यापीठ परिसरातील कर्मचारी भवनात सकाळी दहाला मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. सकाळी दहापर्यंत सरासरी नऊ टक्के, दुपारी १२ पर्यंत २४ टक्के, तर दोनपर्यंत सरासरी ३७ टक्के मतदान झाले होते अशी माहिती कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विनोद पाटील यांनी दिली.

असे झाले मतदान जळगाव जिल्हा

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (२१ टक्के), मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव (४० टक्के), पी.ओ. नहाटा महाविद्यालय, भुसावळ (४३ टक्के), कला, वाणिज्य व मनोहरशेठ धारिवाल विज्ञान महाविद्यालय, जामनेर (७८ टक्के), श्रीमती जी.

जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर(८० टक्के), कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बोदवड (५७ टक्के), धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर (३७ टक्के), कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल (५४ टक्के), रावेर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे महाविद्यालय, रावेर(५३ टक्के), प्रताप महाविद्यालय, अमळनेर (५३ टक्के), डी. एस. पाटील महाविद्यालय, एरंडोल (४३ टक्के), प. रा. हायस्कूल सोसा.चे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धरणगाव (३७ टक्के), कि.वि.प्र.संस्‍थेचे किसान कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पारोळा (४८ टक्के), एम. एम. महाविद्यालय, पाचोरा (६४ टक्के), रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महा., भडगाव (७९ टक्के), बी.पी. कला, एस.एम.ए. विज्ञान व के.के.सी. वाणिज्य महाविद्यालय, चाळीसगाव (६८ टक्के), महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चोपडा (५१ टक्के).

धुळे जिल्हा : झेड. बी. महाविद्यालय, धुळे (३६ टक्के), व्ही. व्ही. एम संस्थेचे महाविद्यालय, साक्री (३१ टक्के), एस. पी. डी. एम. महाविद्यालय, शिरपूर( ५२ टक्के), एस. एस. व्ही. पी. एस. संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय, शिंदखेडा(५५ टक्के), पी. बी. बागल कला व वाणिज्य महाविद्यालय, दोंडाईचा (५९ टक्के).

नंदुरबार जिल्हा : जी. टी. पी. महाविद्यालय, नंदुरबार (४६ टक्के), सु.व्ही.नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, नवापूर (४५ टक्के), पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शहादा (५४ टक्के), कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तळोदा (६३ टक्के), कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अक्कलकुवा (४७ टक्के).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT