jawor crop blooming in the field.  esakal
जळगाव

Jalgaon Agriculture News : ‘सोन्याचं घुंगरू गोफणीला, यंदाच ज्वारीचं पीक आलंय बघा राखणीला..

जळगाव तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या शेतात रब्बी हंगामातील मुख्य ज्वारीचे पीक आता दुल्ल्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Agriculture News : जळगाव तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या शेतात रब्बी हंगामातील मुख्य ज्वारीचे पीक आता दुल्ल्यात आले आहे. तालुक्यातील बळिराजा या पिकाचे पाखरांपासून संरक्षण करण्यात व्यस्त राहात आहे.

पूर्वीप्रमाणे ज्वारीच्या पिकात पाखरे राखण्यासाठी उभारण्यात येत असलेला माचवा आता दुर्मिळ झाल्याचे चित्र आहे. (grain of sown jowar crop started to fill farmers seen protecting jowar crop due to abundance of birds jalgaon agriculture news)

शेताच्या बांधावरून पाखरे हाकली जात आहेत. पाखरे हाकण्यासाठी वापरली जाणारी गोफण फारशी दिसत नसली तरी सध्या ती शेतकऱ्यांच्या हातात दिसत आहे. या तालुक्याच्या शेतशिवारात सोन्याचं घुंगरू गोफणीला, ज्वारीचं पीक आलंय राखणीला' असेच वातावरण आहे.

पेरणी केलेल्या ज्वारी पिकाच्या कणसात दाणा भरू लागला असून पाखरांनाही खाण्याची कमतरता असल्याने ज्वारी पिकावर भरपूर प्रमाणात पाखरे येऊ लागल्याने शेतकरी या पिकाची राखण करताना दिसून येत आहे.

तालुक्यासह राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने पाऊस वेळेवर न पडल्याने यावर्षी ज्वारीची पेरणी कमी झाली आहे. या दुष्काळी परिस्थितीत काही शेतक-यांनी ज्वारीचे पीक मोठ्या कष्टाने जोपासले असून या पिकात दाणा भरू लागला आहे. परिसरात पाखरांना खाण्यासाठी काही नसत्याने या शेतकऱ्यास पाखरांची राखण करावी लागत असून ज्वारीच्या पिकात माचवा करून त्यावर उभारून राखण करण्याचे चित्र आता दुर्मिळ झाले आहे.

शेतकरी आता बांधावर उभा राहून राखण करीत आहे. आता गोफणही दुर्मिळ झाली आहे. पूर्वी प्रत्येक गावाच्या आठवडा बाजारात गोफण विक्रीस येत होती परंतु, आता ती दुर्मिळ आली आहे. कारण ज्वारीचे पीक कमी झाले आहे.

पर्यायाने गोफणीची मागणी कमी राहात आहे. त्यामुळे गोफणी मोठ्या प्रमाणात तयारदेखील केल्या जात नाहीत हे विशेष.

... तरीही भाकरी महागच

सध्या ज्वारीचे पीक कणसे भरण्याच्या स्थितीत असले तरी कमी पावसाने यंदा तुलनेत या तालुक्यात ज्वारी पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणावर झालेली नाही. ज्वारी हे कोरडवाहू पीक असले तरी यंदा ते फक्त पावसावर आलेले नाही.

ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे. त्यांनी हे पीक घेतले आहे. परिणामी ज्वारीची आवक कमीच राहणार आहे. त्यामुळे ज्वारीचे भाव तेजीत राहून भाकरी महागच होणार असल्याचे वास्तव आहे.

सर्वच ठिकाणी शेतकऱ्यांचा कल हा आता पारंपरिक पिके सोडून नगदी पिके घेण्याकडे आहे. कमी दिवसात निघणारे व पैसे मिळवून देणारे पीक म्हणून अनेक शेतकरी मका पिकाकडे वळले आहेत. मात्र, अद्यापही काही शेतकरी जनावरासाठी वैरण व वर्षभर खाण्यासाठी ज्वारी यासाठी ज्वारी पीक घेत आहे.

वेळेवर पाऊस न पडल्याने सर्वच हंगाम वाया गेले आहेत. तथापि, ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची सुविधा आहे त्यांनी मात्र पिके जोपासली आहेत. ज्वारीचे पिकास आता दाना भरू लागला आहे. त्यामुळे पाखरांनी आपला मोर्चा या पिकाकडे वळविला आहे. पाखरांना इतर काही खायला नसल्याने ते ज्वारीवर ताव मारण्यासाठी येत आहेत. त्याची राखण केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT