Balasaheb's Shiv Sena taluka chief Madhukar Patil, former sarpanch Sanjay Patil and villagers while voting by showing their hands at the polling station. esaka
जळगाव

Gram Panchayat Election : पारोळा तालुक्यात 83.06 टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा

पारोळा (जि. जळगाव) : तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींसाठी रविवारी (ता. १८) शांततेत मतदान झाले. काही गावांमध्ये तुरळक वाद वगळता शांततेत मतदान झाले. (Gram Panchayat Election 83 percent voting in Parola taluka jalgaon news)

कंकराज ग्रामपंचायतीत १,३८९ पैकी १,२८० मतदारांनी मतदान केले. ९२.१५ टक्के मतदान झाले. धुळपिंप्री येथे १,३१० पैकी १,१३९ मतदान झाले. ८७ टक्के मतदान झाले. या गावात शिंदे गटाचे वर्चस्व असल्याने ग्रामपंचायतीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

यात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख मधुकर पाटील यांचे पॅनल रिंगणात होते. कन्हेरे ग्रामपंचायतीत १,५५३ पैकी १,४५८ मतदारांनी मतदान केल्याने ९५ टक्के मतदान झाले. या गावात दोन गट एकमेकांविरुद्ध निवडणूक लढले. सावखेडा तुर्क येथे ३८९ पैकी ३८० मतदान होऊन ९५ टक्के मतदान झाले.

हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

मेहू ग्रामपंचायतीत ठरल्याप्रमाणे येथील विकास बोरसे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक बिनविरोध झाली. मात्र, माघारीपर्यंत ठोस निर्णय होऊ न शकल्याने निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. ४९१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

मतदानासाठी तहसीलदार अनिल गवांदे, निवासी नायब तहसीलदार राहुल मुळीक, निवडणूक विभागाचे दिनेश भोई, सहायक निवडणूक अधिकारी राहुल साळवे आदींचे सहकार्य लाभले. पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT