गणपूर : चोपडा तालुक्यातील बहुशिक्षित आणि पगारदारांची मोठी संख्या असलेले हातेड बुद्रूक हे गावाची ओळख आहे. या गावात निवडणुकांमध्ये चुरस निर्माण झाले हे तरच नवल म्हणावे लागेल. गावाची अजून एक ओळख मात्र सद्या हे गाव चर्चेत आहे एका मताने बदलवलेल्या येथील ग्रामपंचायतीच्या निकालाच्या समिकरणाने !
आवर्जून वाचा- लग्नमंडपात सुरू होते कन्यादान; अचानक नवरदेवाच्या आईचे उडाले होश आणि सर्वांची सुरू झाली शोधाशोध !
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत येथे दोन पॅनलमध्ये लढत झाली.माजी शिक्षक आमदार दिलीपराव सोनवणे यांचे ग्रामविकास पॅनल आणि खासदार रक्षा खडसे यांचे समर्थक व माजी सरपंच मनोज सनेर यांच्या जनविकास पॅनल मध्ये अटीतटीची लढत झाली. निवडणूक चुरशीची झाली खरी, पण एका मताने येथील सर्व समिकरणेच बदलवली.
भाजपकडे येणारी सत्ता राष्ट्रवादीकडे
एकूण अकरा सदस्य संख्या असलेल्या पंचायतीत माजी आमदार दिलीपराव सोनवणे यांच्या पॅनलच्या अनिता अनिल सोनवणे या एका मताने विजयी झाल्याने त्यांचे पॅनल बहुमताने म्हणजे सहा जागांवर विजयी झाले. आणि मनोज सनेर यांच्या जनविकास पॅनलला पाच जागांवर समाधान मानावे लागले. याच एका मताने बहुमत ग्रामविकास पॅनलकडे येण्यास मदत झाली. याच एका मतामुळे येथील ग्रामपंचायत भाजप ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली. आणि याच एका मतांमुळे या पंचायतीत सत्ता परिवर्तनाची आशा बळावली आहे. एकंदरीत पाहता निवडणुकीच्या एका मताची किमया या गावाने अनुभवली आहे हे मात्र निश्चित.
आवर्जून वाचा- बँकेत नोकरी लागली; काही दिवसात रुजू होणार तोच तरुणाने उचले टोकाचे पाऊल, आणि सर्वांना विचारात पाडले
गावाचा असा राजकीय संबंध
हातेड गाव हे माजी शिक्षक आमदार प्रा दिलीपराव सोनवणे यांचे हे गाव तर खासदार रक्षा खडसे यांनी दत्तक घेतलेले हे गाव आहे.
25 वर्षानंतर पुनरावृत्ती
ज्या वार्डात एक मताची किमया यावेळी झाली त्याच वार्डात 25 वर्षांपूर्वी एक मताने विजय होऊन बहुमताची सहावी जागा निवडून आली होती आणि बहुमताचे पारडे जड झाले होते त्याची पुनरावृत्ती झाली हे विशेष!
संपादन- भूषण श्रीखंडे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.