Gram Panchayat Employees Protest 3 thousand employees of 11 hundred places are on strike jalgaon news esakal
जळगाव

Gram Panchayat Employees Protest: ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ‘गावगाडा’ ठप्प; 3 हजार कर्मचारी संपावर

सकाळ वृत्तसेवा

Gram Panchayat Employees Protest : राज्यातील ग्रामपंचायतीच्या संदर्भात सर्वच घटकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक सोमवारपासून संपावर गेल्याने ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होवून पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.

नागरिकांना ग्रामपंचायत कार्यालयातील कामे करता आली नाही. पथदिवेही बंद असल्याने रात्री अंधार पसरला होता. (Gram Panchayat Employees Protest 3 thousand employees of 11 hundred places are on strike jalgaon news)

जिल्ह्यातील ११५१ ग्रामपंचायीतील सुमारे तीन हजारांवर कर्मचारी संपावर गेले आहेत. अखिल भारतीय सरपंच परिषदेअंतर्गत हा संप सुरू करण्यात आला आहे.

या मागण्यांसाठी संप

ग्रामीण व दुर्गम भागातील गावातील समस्या स्वातंत्र्यानंतरही तशाच आहे. शासनाने ग्रामपंचायतीकडे लक्ष द्यावे, गावात शहरासारख्या सुविधा द्याव्यात, सरपंचासह कमचाऱ्यांना मानधनाऐवजी वेतन द्यावे, ग्रामपंचायत विभागातून किमान सहा आमदार निवडून जावेत, विधान परिषदेचया निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा हक्क मिळावा, मुंबईत सरपंच भवन असावे

ग्रामपंचायत कमचाऱ्यांना नगरपालिका कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्याप्रमाणे वेतन द्यावे, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्र करून पंचायत विकास अधिकारी पद निर्माण करावे, ग्रामसेवकांकडील अतिरिक्त कामे रद्द करावीत, विनाकारण कामावरून कमी कलेलया ग्रामरोजगार सेवकांना परत कामावर घेण्यात यावे आदी मागण्यांसाठी तीन दिवस संप पाळण्यात येत आहे.

नागरिकांचे हाल

सकाळी नागरिकांनी अर्ज आपापल्या कामांसाठी ग्रामपंचायत कार्यालय गाठले. मात्र, कार्यालय बंद असल्याने त्यांना परतावे लागले. घराचे उतारे काढणे, पाणीपट्टी भरणे यासह अनेक प्रकारची कामे करता आली नाही. अनेक भागात पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांचे हाल झाले. रोजगार सेवक, ग्रामसेवक, संगणक परिचालक, कर्मचारी यांनी संपात सहभाग घेतला.

"संपामुळे गावात पाणीपुरवठ्यात अडचणी आल्या. कोणत्याही प्रकारचे दाखल देता आले नाही. रात्री पथदिवेही बंद होते. नागरिकांची गैरसोय झाली." - मनोज चौधरी, सरपंच, भादली

"ग्रामपंचायत कार्यालय आज बंद होते. कर्मचारीही नव्हते. नागरिकांना विविध प्रकारचे दाखल काढता आले नाही. पाणीपुरवठा ठप्प झाला होता. अजून दोन दिवस नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे.'' - किशोर चौधरी, ग्रामस्थ, आसोदा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lebanon Walkie-Talkies Blast: पेजरनंतर वॉकीटॉकी अन् सौर यंत्रणेत स्फोट! 14 ठार तर 450 जखमी, मोबाईलसुद्धा न वापरण्याचा सल्ला!

अग्रलेख : प्रतिमानिर्मितीचे प्रयोग

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT