Pik Vima yojna News esakal
जळगाव

Jalgaon News : वाढीव तापमानामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांसह पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना हवामान आधारित फळ पीकविमा योजनेचा लाभ मिळणार आहे.

यापूर्वीही हवामानावर आधारित पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला होता, आता तर वाढीव तापमानामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. (Guardian Minister Gulabrao Patil say Compensation will be given for damage caused due to increased temperature Jalgaon News)

मे महिन्यात सलग पाच दिवस ४५ अंश तापमान असल्याने प्रतिहेक्टर ४३ हजार ५०० रुपये नुकसानभरपाई मिळणार आहे.

पात्र मंडले अशी : जळगाव-पिंप्राळा, असोदा, जळगाव शहर, भोकर, म्हसावद, धरणगाव-धरणगाव, पाळधी, पिंप्री, साळवा, सोनवद, एरंडोल-एरंडोल, रिंगणगाव, चोपडा-अडावद, लासूर, धानोरा प्र., चोपडा, गोरगावले, हातेड बुद्रुक, चहार्डी, अमळनेर-अमळगाव, भरवस, मारवड, नगाव, चाळीसगाव- शिरसगाव, पारोळा-बहादरपूर, भडगाव-भडगाव, रावेर-ऐनपूर, खानापूर, खिर्डी बुद्रुक, खिरोदा, निंभोरा बुद्रुक, रावेर, सावदा, मुक्ताईनगर- घोडसगाव, अंतुर्ली, कुऱ्हे, मुक्ताईनगर, यावल-भालोद, साकाळी, किनगाव बुद्रुक, बामणोद, यावल, फैजपूर, भुसावळ- वरणगाव, भुसावळ.

जिल्ह्यात केळी उत्पादक मोठ्या संख्येने असून, पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीकविमा योजना आंबिया बहारमधील केळी पिकाच्या अनुषंगाने, महावेध माहिती (डेटा)नुसार असे लक्षात आले आहे, की एप्रिल व मेदरम्यान जिल्ह्यातील ६० महसूल मंडलात सलग ५ दिवस तापमान जास्त राहिल्याने केळी पिकाला जास्त तापमानाचा फटका बसून बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

एप्रिल महिन्यात सलग ५ दिवस ४२ अंश तापमान असल्याने प्रतिहेक्टर ३५ हजार नुकसानभरपाईस पात्र मंडले अशी : जळगाव-नशिराबाद, धरणगाव-चांदसर, भुसावळ-कुऱ्हे प्र. न., पिंपळगाव खुर्द, अमळनेर-अमळनेर, शिरूड, वावडे, बोदवड-बोदवड, नाडगाव, एरंडोल-कासोदा, पारोळा-तामसवाडी, चोरवड, चाळीसगाव-मेहुणबारे, जामनेर-जामनेर, पहूर, पाचोरा- पिंपळगाव खुर्द.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यापूर्वी १ नोव्हेंबर २०२२ ते २८ फेब्रुवारी २०२३ दरम्यान जिल्ह्यातील ५६ महसूल मंडलात सलग तीन दिवस कमी तापमानामुळे प्रतिहेक्टर २६ हजार ५०० रुपये मंजूर झाले होते. ती मंडले अशी : जळगाव-पिंप्राळा, नशिराबाद, भोकर, म्हसावद, धरणगाव- धरणगाव, चांदसर, पाळधी, प्रिंपी, साळवा, सोनवद, अमळनेर-अमळगाव, अमळनेर, मारवड, नगाव, पातोंडा, शिरूड, भरवस, भडगाव-आमडदे, भडगाव, कोळगाव, कजगाव, चाळीसगाव-बहाळ, एरंडोल- उत्राण, रिंगणगाव, पारोळा-बहादरपूर, जामनेर- जामनेर, नेरी बुद्रुक, मालदाभाडी, बोदवड- बोदवड, नाडगाव, करंजी, चोपडा- अडावद, चोपडा, धानोरा प्र. अ., गोरगावले, हातेड बुद्रुक, लासूर, मुक्ताईनगर- मुक्ताईनगर, अंतुर्ली, घोडसगाव, कुऱ्हे, रावेर-खानापूर, खिर्डी, खिरोदा, निंभोरा बुद्रुक, रावेर, सावदा, ऐनपूर, यावल- बामनोद, भालोद, फैजपूर, किनगाव बुद्रुक, साकळी, यावल, भुसावळ- पिंपळगाव, वरणगाव.

पीकविम्यासंदर्भात काही अडचण अथवा अधिक माहितीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT