Gulabrao Patil News : ग्रामस्थांनी गावात स्वच्छता राखून आरोग्याची काळजी घ्यावी. आरोग्यसेवेतून आत्मिक समाधान मिळते. १५ ऑगस्टपासून सर्व शासकीय रुग्णालयांत शासनामार्फत मोफत आरोग्यसेवा पुरविल्या जात आहेत. (Guardian Minister Gulabrao Patil statement about abha card jalgaon news)
प्रत्येकाला पाच लाखांपर्यंत या ‘आभा’ (आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट) कार्डद्वारे मोफत आरोग्य सेवा मिळणार असून, आपल्या आरोग्याविषयी माहिती असलेले आभा कार्ड प्रत्येक नागरिकांसाठी नवसंजीवनी व आधारवड ठरणार आहे, असे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
नांद्रा बुद्रुक येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त झालेल्या आरोग्य शिबिरात ‘आभा’ कार्डच्या वाटपाप्रसंगी ते बोलत होते. जिल्हाप्रमुख नीलेश पाटील अध्यक्षस्थानी होते.
कैलास पाटील, सरपंच कविताबाई पाटील, उपसरपंच जनाबाई सोनवणे, तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण, माजी उपसभापती डॉ. कमलाकर पाटील, रामचंद्र पाटील, माजी सभापती मुकुंद नन्नवरे, जनाआप्पा कोळी, ग्रामपंचायत सदस्य पंकज पाटील, वैशाली बाविस्कर, मीना सोनवणे, पीयूष पाटील, युवासेनेचे शिवराज पाटील, गोपाल पाटील आदी उपस्थित होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
पालकमंत्री पाटील म्हणाले, की कानळदा ते रिधुर रस्त्याच्या डांबरीकरणासाठी पाच कोटी तसेच नांद्रा ते चांदसर रस्त्यासाठी ५० लाखांचा निधी मंजूर आहे. गावातील तरुणांनी केलेल्या मागणीनुसार साहित्यासह व्यायामशाळेचे बांधकाम मंजूर केले असून, लवकरच या कामांना सुरवात होणार आहे. गावातील ११ स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी स्वातंत्र्यसैनिक भवनाचे नूतनीकरण करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
आरोग्य शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत सुमारे ३५० रुग्णांची तपासणी करण्यात आली. आरोग्य शिबिरासाठी आर. एल. मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल व जिल्हा सामान्य रुग्णालयाने सहकार्य केले. सीए हितेश आगीवाल यांनी प्रास्ताविक केले. राजू पाटील यांनी सूत्रसंचालन केले. मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंदराव गोसावी यांनी आभार मानले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.