Guardian Minister Gulabrao Patil and others welcoming Muslim youths when they join Shiv Sena.  esakal
जळगाव

Gulabrao Patil : बाळासाहेब वैयक्तिक प्रॉपर्टी नाही, देशाची प्रॉपर्टी : पालकमंत्री पाटील

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : ‘बाळासाहेबांचे नाव वापरू नका’, हे अनेक वेळेस बोलले असून, त्यामुळे त्या गोष्टीला किती धार द्यावी, हे मला तरी वाटते चुकीचे होईल. उद्धव ठाकरेंसोबत मी ३५ वर्षे राहिलो आहे. त्यांचे शब्दप्रयोग माहिती आहेत. (Guardian minister gulabrao Patil statement about balasaheb thackeray jalgaon news)

त्यामुळे आम्ही रक्त पिणारे ढेकूण नसून रक्त देणारे शिवसैनिक आहे, असे प्रत्युत्तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे. पाचोरा येथील सभेत शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. याच पार्श्वभूमीवर मंत्री पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते अजिंठा विश्रामगृहात बोलत होते.

ते म्हणाले, की बाळासाहेब ही त्यांची स्वतःची प्रॉपर्टी नाही; मान्य आहे ते त्यांचे वडील आहेत. पण बाळासाहेब या देशाची प्रॉपर्टी आहे. तमाम जनतेसाठी आदर्श आहेत. त्यामुळे त्यांचे नाव कुणीही वापरेल. महापुरुषांचे फोटो, नाव वापरणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

मुस्लिम युवकांचा शिवसेनेत प्रवेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन पालकमंत्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली जळगाव महानगर, ममुराबाद, नशिराबाद व मेहरूण परिसरातील शेख इकबाल शेख सलीम, अखिल मुलतानी, अजमल मिर्झा, शरीफ शह धीरज सरपटे, मजीद शेख, जुबेर शाह, आमीन शेख, सलीम खाटीक, साजिद शेख, रईस पटेल, अब्दुल पटेल, समीर पटेल, बाबू मुलतानी, सोहेल मुलतानी, दानिश मुलतानी यांच्यासह अनेक मुस्लिम व इतर युवक कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

उप शहरप्रमुखपदी शेख

या वेळी प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे मंत्री पाटील यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. या वेळी शेख इकबाल शेख सलीम यांची जळगाव महानगरच्या उप शहरप्रमुखपदी निवड करण्यात येऊन मंत्री पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महिला संपर्कप्रमुख सरिता माळी-कोल्हे, माजी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, सोहम विसपुते, अजय देशमुख, नगरसेवक दिलीप पोकळे, कुंदन काळे, चेतन सनकत यांच्यासह आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वडाळ्यातून भाजपचे कालिदास कोळमकर ५६५६ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT