Gulabrao Patil : शासन आपल्या दारी अभियानांतर्गत जळगावचा जिल्हास्तरीय कार्यक्रम हा आतापर्यंतच्या कार्यक्रमांपेक्षा सरस होईल, असे जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे.
कार्यक्रमाच्या दिवशी लाभार्थी कार्यक्रमस्थळी येताना कोणाचीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. विशेषत: वयोवृद्ध व दिव्यांग लाभार्थी, लहान बालके, शालेय विद्यार्थ्यांची विशेष काळजी घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी (ता. २५) येथे दिल्या. (Guardian Minister Patil statement about Saras planning of shasan aplya dari program)
‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत जळगाव येथे जिल्हास्तरीय कार्यक्रम मंगळवारी (ता. २७) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. कार्यक्रमाचा मुख्य समारंभ पोलिस कवायत मैदानावर होणार आहे. या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, पालकमंत्री पाटील यांनी रविवारी या ठिकाणाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.
आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अमन मित्तल, पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, महापालिका आयुक्त विद्या गायकवाड, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे, प्रांताधिकारी महेश सुधाळकर, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, पोलिस उपअधीक्षक संदीप गावित, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, तहसीलदार नामदेव पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील यांनी मुख्य स्टेज, सभा मंडप, लोकप्रतिनिधींची व मान्यवर बैठक व्यवस्था, लाभार्थ्यांच्या येण्या-जाण्याचे मार्ग, बैठक व्यवस्था, जिल्ह्यातील सरपंचांची बैठक व्यवस्था, शासकीय विभागांमार्फत लावण्यात येणारे विविध स्टॉल, रोजगार मेळावा, कृषी प्रदर्शन, आरोग्य शिबिराची जागा, पोलिस बंदोबस्त, वाहतुकीचे नियोजन आदींची पाहणी करून प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहिती जिल्हाधिकारी मित्तल, पोलिस अधीक्षक राजकुमार यांच्याकडून जाणून घेतली. वाहनतळ ते कार्यक्रमस्थळावरील मार्गावर वाहतुकीचे नियोजन व्यवस्थित करण्याबाबतही त्यांनी सूचित केले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
३५ हजार उपस्थितीचे नियोजन
जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ अभियान राबविण्यास १५ एप्रिलपासून सुरवात झाली असून, शासनाच्या विविध विभागांतर्फे जिल्ह्यातील दोन लाख ५३ हजार १२४ लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यात आले आहेत. त्यापैकी ३५ हजार लाभार्थी कार्यक्रमास उपस्थित राहतील, याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
अशी आहे पार्किंगची व्यवस्था
कार्यक्रमासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांना कार्यक्रमास उपस्थित राहता यावे, यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे गाव व तालुका पातळीवरून वाहतूक व्यवस्था केली आहे. लाभार्थ्यांची ने-आण करण्यासाठी एसटी महामंडळ व खासगी २५० बस उपलब्ध करून दिल्या आहेत.
एक हजार चारचाकी, तर २१०० पेक्षा अधिक दुचाकी जळगाव शहरात येतील, असे गृहित धरून एकलव्य क्रीडा संकुल, जी. एस. मैदान, नेरी नाका ट्रॅव्हल्स पॉईंट, सागर पार्क, खानदेश सेंट्रल मॉल याठिकाणी वाहने पार्किंगची व्यवस्था केली आहे. एस. टी. वर्कशॉप, ब्रुक बॅण्ड कॉलनी, रिंगरोड याठिकाणी राखीव पार्किंगसाठी जागा ठेवली आहे.
आरोग्य शिबिर
कार्यक्रमस्थळी जिल्हा रुग्णालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे मंगळवारी सकाळी साडेआठपासून रोगनिदान व रक्तदान शिबिर होणार आहे. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांना गोल्डन कार्ड व आयुष्मान भारत हेल्थ कार्ड योजनेसंदर्भातील माहिती व कार्डचे वितरण होणार आहे.
विविध विभागांच्या स्टॉलची
जिल्हा पोलिस कवायत मैदानावर मंगळवारी सकाळी दहाला शासनाच्या विविध विभागांचे माहितीपूर्ण स्टॉल लावण्यात येणार आहेत. त्याठिकाणी नागरिक व लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व नूतन मराठा महाविद्यालयातर्फे सकाळी दहापासून नूतन मराठा महाविद्यालयात ऑफलाईन रोजगार मेळावा होईल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.