Guardian Minister Gulabrao Patil inaugurating the convocation at Indira Gandhi Vidyalaya. Along with the president of the organization D. G. Patil, Secretary C. K. Patil, Tehsildar Mahendra Suryavanshi, Police Inspector Uddhav Dhmale etc. esakal
जळगाव

Gulabrao Patil News : विद्यार्थ्यांची सेवा हीच खरी परमेश्वराची सेवा : पालकमंत्री पाटील

व्यक्तिमत्त्व विकासासाठी स्नेहसंमेलन उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनानिमित्त प्राप्त झालेल्या व्यासपीठाचा विधायक उपयोग करून घ्यावा. ही संस्था विद्यार्थ्यांसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवीत असते.

सकाळ वृत्तसेवा

Gulabrao Patil News : व्यक्तिमत्त्व विकासासाठी स्नेहसंमेलन उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनानिमित्त प्राप्त झालेल्या व्यासपीठाचा विधायक उपयोग करून घ्यावा. ही संस्था विद्यार्थ्यांसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवीत असते.

विद्यार्थी घडविण्यासाठी धडपडत असते. विद्यार्थ्यांची सेवा हीच खरी परमेश्वराची सेवा आहे, असे मत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. (Guardian Minister Patil statement of service of students is true service of God jalgaon news)

येथील पू. गो. गं. वाजपेयी गुरुजी शिक्षण शिक्षणप्रसारक मंडळ संचलित प्रा. व्ही. जी. पाटील प्राथमिक विद्या मंदिर, इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नाईक एज्युकेशन सोसायटीचे आदर्श माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

संस्थेचे अध्यक्ष डी. जी. पाटील हे अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर संस्थेचे सचिव सी. के. पाटील, तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे, उद्योजक तथा रोटरी क्लबचे अध्यक्ष सचिन जेठवानी, सचिव गोविंद शर्मा, नाईक एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष किरण पाटील, संचालक अश्विन पाटील, संचालक भरत पाटील.

प्राचार्य सुरेखा पाटील, मुख्याध्यापक संदीपकुमार सोनवणे, पर्यवेक्षक ए. एस. पाटील प्राथमिकचे मुख्याध्यापक बळवंत पाटील, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख पी. एम. पाटील, गटनेते पप्पू भावे, स्नेहसंमेलन प्रमुख आर. पी. पाटील, डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायत सदस्या चारुशीला पाटील आदी उपस्थित होते.

स्नेहसंमेलनात जिल्हास्तरावर वक्तृत्व स्पर्धेत प्रथम तसेच बोर्डात दहावी, बारावीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना, शालेय निबंध, चित्रकला व क्रीडा स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना पालकमंत्री पाटील व मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.

इंदिरा गांधी विद्यालयाची विद्यार्थिनी चेतना पुरुषोत्तम पोतकर ही ९६ टक्के गुण प्राप्त करून दहावीत तालुक्यातून प्रथम आल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यातर्फे ऍक्टिवा दुचाकी भेट म्हणून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT