Guardian Minister Gulabrao Patil and others while inaugurating the ambulance.  esakal
जळगाव

Gulabrao Patil News : प्रेम, अशिर्वादातून उतराईसाठी भोलाणेवासियांची कामे करणार : पालकमंत्री पाटील

सकाळ वृत्तसेवा

Gulabrao Patil News : रुग्णसेवेत रुग्णवाहिकेचे अनन्य साधारण महत्त्व आहे.

स्व. अमोल कोळी यांच्या स्मरणार्थ श्री अण्णाभाऊ विठ्ठल कोळी यांनी दिलेल्या रुग्ण्‍वाहिकेमुळे गरजू रुग्णांना जलद उपचार मिळण्यास मदत होणार असून जीवनदायी ठरणार आहे. भोलाणे व परिसरातील नागरिकांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहिले आहेत. (Guardian Minister Patil statement on Bholane residents citizen jalgaon news)

महर्षी वाल्मिक सभागृहासाठी व वाचनालयासाठी निधी मंजूर करणार आहे. भोलाणे व परिसरवासियांनी दिलेल्या प्रेम व आशिर्वादातून उतराई होण्यासाठी कामांवर भर देणार आहे. असे भावानोद्‌गार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काढले.

भोलाणे येथे रुग्णवाहिका लोकार्पण व विकास कामांच्या भूमिपूजनावेळी ते बोलत होते. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील अध्यक्षस्थानी होते. ढोल- ताश्यांच्या गजरात पालकमंत्री व मान्यवरांची मिरवणूक काढण्यात आली. ग्राम पंचायत, विकास सोसायटी, भजनी मंडळ व ग्रामस्थांतर्फे मंत्री पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी अमोल कोळी यांचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे कुटुंबीय, अण्णा विठ्ठल कोळी व भरत येवस्कर यांनी गाव व परिसरासाठी रुग्ण्‍वाहिका देण्याचा निर्णय घेतला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. गावांतर्गत २० लाखांच्या रस्ता काँक्रीटीकरण व आमदार निधीतील ३ लाखांच्या चौक काँक्रीटीकरण कामाचेही या वेळी विधिवत पूजन करण्यात आले. भोलणे व परिसरातील रस्त्यांसाठी १५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

नामदेव सपकाळे यांनी सूत्रसंचालन केले. अजय कोळी यांनी आभार मानले. उप जिल्हाप्रमुख नरेंद्र सोनवणे, भादलीचे सरपंच मिलिंद चौधरी, भोलाणेचे सरपंच नितीन कोळी, उपसरपंच देविदास कोळी, माजी सरपंच नानाभाऊ सोनवणे, भिमराव सपकाळे, रामकृष्ण कोळी, सोमनाथ कोळी, नागो कोळी, समाधान कोळी, सदस्या सुरेखा कोळी, शोभा कोळी, लताबाई कोळी यांच्यासह भोलाणे व भादली परिसरातील पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT