Gulabrao Patil esakal
जळगाव

Gulabrao Patil : एकनाथ शिंदेंनी उठाव केला नसता,तर राष्ट्रवादीच भाजपसोबत सत्तेत दिसली असती

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठाव केला नसता, तर कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसच भाजपसोबत सत्तेत दिसली असती, असे धक्कादायक विधान राज्याचे पाणीपुरवठामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शनिवारी (ता. ५) पत्रकारांशी बोलताना केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिर्डी येथे पत्रकारांशी बोलताना राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार शिर्डी येथील अधिवेशनानंतर कोसळेल, असे भाकीत केले आहे. यावर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांना शनिवारी प्रतिक्रिया विचारली असता, ते म्हणाले, की भारतीय जनता पक्षासोबत राष्ट्रवादी काँग्रेसने पहाटे कोंबडा आरविण्यापूर्वीच सत्तेत मंत्रिपदाची शपथ घेतली होती. (Gulabrao Patil Important Statement in Shirdi Press meet Jalgaon Crime News)

शहाजीबापू पाटील, तर आता बोलले; परंतु त्या अगोदरच राष्ट्रवादी भाजपसोबत गेली होती. आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठाव केला नसता, तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबतच गेली असती, असा दावाही त्यांनी केला.

जयंत पाटील यांनी शिबिर संपल्यानंतर सरकार कोसळण्याचा दावा केला आहे., मात्र आज शिबिर संपले आहे. त्यामुळे आपण सरकार पडण्याची वाट पाहत आहोत. आपले आमदार आपल्यासोबत कायम राहावे म्हणून त्यांना असे बोलावे लागते. आमचे सरकार पडणार नाही, ते भक्कम आहे. दोन वर्षाचा कार्यकाळ आमचे सरकार पूर्ण करेल, असा दावाही त्यांनी केला.

आम्ही पक्ष बदललेला नाही

शिवसेना पक्ष सोडण्याबाबत ते म्हणाले, की आम्ही पक्ष सोडलेला नाही किंवा भाजपतही प्रवेश केलेला नाही. उलट आमच्या पक्षाचे नाव ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे आहे, आमची निशाणीही ढाल-तलवार आहे. त्यामुळे आम्ही शिवसेनेतच आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT