Gulabrao Patil esakal
जळगाव

Gulabrao Patil News : नावीन्यपूर्ण, तंत्रज्ञानस्नेही उपक्रम राबवा : पालकमंत्री पाटील

सकाळ वृत्तसेवा

Gulabrao Patil News : प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमध्ये वाढ, लोकाभिमुखता व निर्णयशीलता आणण्यासाठी, सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्याकरिता ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान’ राबविले जात आहे.

(gulabrao Patil statement about Implement innovative technology friendly activities jalgaon news)

प्रशासकीय कामात गतिमानता आणण्यासाठी नावीन्यपूर्ण, तंत्रज्ञान स्नेही उपक्रम राबवून अभियान यशस्वी करावे. अशा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिल्या.

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता.२३) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक एम राजकुमार, जळगाव वन उपसंरक्षक प्रवीण ए, मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले, की राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा जिल्ह्यात २० ऑगस्टपासून राबविण्यात येत आहे.

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धेत ३१ ऑक्टोबरच्या आत pragatiabhiyan.maharashtra.gov.in या लिंकवर जाऊन ऑनलाइन अर्ज दाखल करून सर्व शासकीय विभागांनी अभियानात सहभाग नोंदवावा. जिल्हास्तरावरील व तालुकास्तरावरील स्पर्धेचे अर्ज विहित कालावधीत ऑनलाइन पद्धतीने पाठविण्यात यावेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Helicopter: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडक्यात बचावले! हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग; काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Vidhansabha Election 2024 : महायुतीत ४५ जागांच्या वाटपावर खल; जागा सोडण्यावरून स्थानिक पदाधिकारी आक्रमक

Sports News on 18th October 2024: भारताचे कसोटी सामन्यात पुनरागमन ते पाकिस्तानचा इंग्लंडविरूद्ध दणदणीत विजय

रणबीर- आलियाच्या बांद्रामधील घराची पहिली झलक समोर; नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट, म्हणाले- हे काय बनवलंय भाऊ..

Diwali Recipe : दिवाळीत नुसता चिवडा बेचव लागतो, विकतची कशाला घरी अशी बनवा कुरकुरीत शेव

SCROLL FOR NEXT