Gulabrao Patil News : जळगाव शहराची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी जळगाव बायपासचे मार्च २०२४ पर्यंत काम पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शनिवारी (ता. ३०) येथे दिल्या.(Gulabrao Patil statement of Jalgaon bypass work should be completed by March jalgaon news )
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील जळगाव बायपासच्या प्रगतिपथावरील कामांचा पालकमंत्र्यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी परीविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा जळगाव तहसीलदार अर्पित चव्हाण, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) जयश्री माळी, उपविभागीय अधिकारी महेश सुधळकर, तहसीलदार विजय बनसोडे, राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार, शेळावे बॅरेजचे अधिकारी उपस्थित होते.
दीड लाख टन माती, मुरमाची आवश्यकता
पालकमंत्री म्हणाले, की जळगाव बायपासच्या कामांना गती देण्यात यावी. या वेळी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व ठेकेदारांनी बायपासच्या भराव कामासाठी दीड लाख टन माती, मुरूम आवश्यक आहे, अशी मागणी केली.
त्यावर पालकमंत्री पाटील यांनी सांगितले, की शेळगाव बॅरेजमधून नियमानुसार रॉयल्टी भरून मुरूम, माती उपलब्ध करून घ्यावी. यासाठी महसूल व शेळगाव बॅरेज प्रकल्पातील अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे. महामार्गावर येणाऱ्या रेल्वे फाटक उड्डाणपुलाच्या बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करावी.
जिल्हाधिकाऱ्यांची रस्त्यावर जाऊन पाहणी
बैठकीपूर्वी, जळगाव शहराच्या बाहेरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या तरसोद- पाळधीच्या बायपासच्या कामांची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शनिवारी सकाळी पाहणी केली. याप्रसंगी राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार, तसेच महामार्ग प्रकल्पाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तरसोदकडे जाणाऱ्या आसोदा रेल्वे उड्डाणपुलापासून पाहणीस सुरवात केली. तरसोद ते पाळधी या १८ किलोमीटर बायपासच्या संपूर्ण कामांची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली.
...या गावांमध्ये भुयारी मार्ग
राष्ट्रीय महामार्ग बायपासच्या मार्गावर अनेक लहान-मोठे गावे येतात. त्यात तरसोद, असोदा, भोकणी, आव्हाणे, ममुराबाद, जळगाव शिवार, पाळधी आदी गावांचा समावेश आहे. बायपासअंतर्गत तीन ठिकाणी उड्डाणपूल तयार करण्यात येत आहेत. गिरणा नदीवरील तीनशे मीटरच्या पुलाचे काम सध्या गतीने सुरू आहे. या सर्व कामांची जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी पाहणी केली व प्रगती जाणून घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.