Guardian Minister Gulabrao Patil while guiding the Gram Sabha. esakal
जळगाव

Gulabrao Patil : आरोग्य सुदृढसाठी गाव हागणदारीमुक्त हवे : पालकमंत्री पाटील

गाव स्वच्छतेसाठी ‘ग्रामसभा’ प्रभावशाली साधन असून, नागरिकांचे आरोग्य सुदृढ, निरोगी राहण्यासाठी गाव सातत्याने हागणदारीमुक्त असावे.

सकाळ वृत्तसेवा

Gulabrao Patil : पाणी, स्वच्छता, आरोग्य हे आपल्या वैयक्तिक आणि सामूहिक जीवनातील तीन महत्त्वाचे घटक आहेत. ग्रामसभा ही केवळ प्रबोधनासाठी उपलब्ध साधन नसून, ती गावाला दिशा देणारी विशेष सभा आहे.

गाव स्वच्छतेसाठी ‘ग्रामसभा’ प्रभावशाली साधन असून, नागरिकांचे आरोग्य सुदृढ, निरोगी राहण्यासाठी गाव सातत्याने हागणदारीमुक्त असावे. (gulabrao patil statement of state government is providing individual and public toilets jalgaon news)

त्यासाठी सुंदर, स्वच्छ गावची ओळख निर्माण करण्यासाठी नागरिकांनी समाजाप्रति आपले निरंतर कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी (ता. २२) येथे केले.

राज्यात एकाच वेळेस २८ हजार ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा पार पडत आहेत. जळगाव जिल्ह्यातील ग्रामसभांची सुरवात शुक्रवारी पाळधी बुद्रुक व खुर्द ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेतून झाली. त्या वेळी पालकमंत्री पाटील बोलत होते.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पाळधी बुद्रुकचे सरपंच विजय पाटील, उपसरपंच राहुल धनगर, पाळधी खुर्द सरपंच लक्ष्मीबाई कोळी, उपसरपंच भारती पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, प्रकल्प संचालक बी. एस. कोसोदे, बीडीओ सुशांत पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चव्हाण, अधिकारी संजय धनगर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, की राज्य शासन वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय उपलब्ध करून देत आहे. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांसाठी कार्यशाळा घ्यावी. ग्रामस्थांनी वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांचा वापर करावा.

जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले, की ग्रामसभांच्या माध्यमातून गावातील शौचालयांच्या लाभापासून वंचित लाभार्थ्यांना लाभ उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी. जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाळधी गावला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचे काम पूर्णत्वास गेले आहे. दीड महिन्याच्या आत पाळधी ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळणार आहे. गावाला धूळ, कचरा व हागणदरीमुक्त करण्यासाठी ग्रामसभांनी विशेष प्रयत्न करावेत.

श्री. अंकित म्हणाले, की जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रत्येक गावातील प्रत्येक घरात शौचालय असणे गरजेचे आहे. स्वच्छता असणे गरजेचे आहे. मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या वेळी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे वारस वंदना सुकलाल पाटील (अनोरे), प्रतिभा धोंडू इंगळे, (साळवा), शोभा रमेश पाटील (तरडे) यांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या धनादेशाद्वारे शासकीय मदत देण्यात आली.

आयुष्यमान कार्डाचे प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत धरणगाव तालुक्यातील पन्नास पात्र लाभार्थ्यांची प्रकरणे या वेळी पालकमंत्र्यांनी मंजूर केली. सहाय्यक गटविकास अधिकारी कैलास पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: गणेश नाईक हजार 25 हजार 52 एवढ्या मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT