Rain Update News esakal
जळगाव

Jalgaon Rain Update : अर्ध्या तासाच्या पावसाने व तासाभराच्या वादळाने जळगावकरांची केली दाणादाण

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरात रविवारी (ता. ४) दुपारी दीड ते तीनच्या दरम्यान जोरदार वादळ झाले. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. झाडे विजेच्या तारांवर पडल्याने अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत झाला.

अनेक वाहनांवरही झाडे पडल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले. वादळ सुरू असताना रस्त्यांवर वाहनांना थांबून घ्यावे लागले. काही वेळ पावसाने हजेरी लावल्याने शहरात गारवा निर्माण झाला होता. दुपारनंतर मात्र पून्हा उन पडले होते. (Half hour of rain and hour long storm made people of Jalgaon miserable Power lines broken house Jalgaon News)

शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून वातावरण दमट होते. कुलर, पंखे लावूनही अंगाला चिकटपणा येत होता. रविवारी सकाळपासून मात्र जोरदार गार वारे वाहु लागले होते. दुपारी दीडच्या सुमारास अचानक जोरदार वाऱ्याचे रूपांतर वादळात झाले.

अचानक वीज पुरवठा खंडीत झाला. तब्बल एक तास वादळाचा जोर होता. यामुळे शहरातील रिंगरोड परिसर, गणेश कॉलनी, शिवकॉलनी, नवीपेठेतील अनेक झाडे पडली.

गणेश कॉलनीतील रोडवरील अनेक झाडे एकामोगामाग पडल्याने विजेच्या तारा तुटून, रस्ताही बंद झाला होता. मेहरूण परिसरातील श्रीराम मंदिर चौकात शंभर वर्ष जूने वडाचे झाड उन्मळून पडले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या घरासमोरील गुलमोहराचे झाड पडल्याने वाहतुक विस्कळीत झाली होती. शिरसोलीत एका घराशेजारी असलेली झोपडी तुटून त्याखाली एक व्यक्ती दाबला गेला.

अचानक झालेल्या वादळाने सर्वांचीच दाणादाण उडाली. रविवार असल्याने बाजारपेठा बंद होत्या. त्यामुळे नागरिकांची बाजारपेठेत गर्दी नव्हती. महापालिकेच्या इमारतीत जमविलेल्या टपऱ्यांवरील पत्रे, प्लायवूड वादळाने उडून खाली पडले. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही.

अर्धातास पाउस

वादळानंतर शहरातील अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. अनेक दिवसांपासून उन्हाने तप्त झालेल्या धरणीमातेवर पावसाचा वर्षाव झाल्याने तिला सुगंध सुटला होता. अनेक उथळ भागात पावसाचे पाणी साचल्याचे चित्र होते. मान्सूनपूर्व पाउस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. लवकरच मान्सूनही दाखल होण्याची ही चिन्हे असल्याचे जूने जाणकार सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT