Rural Hospital  esakal
जळगाव

Jalgaon News : चाळीसगावचे ग्रामीण रुग्णालय सलाईनवर; वैद्यकीय अधिकाऱ्यांसह निम्मी पदे रिक्त

सकाळ वृत्तसेवा

भिकन वाणी : सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव (जि. जळगाव) : जिल्ह्यातील भौगोलिक आणि लोकसंख्येने सर्वांत मोठा तालुका आणि शहर असलेल्या चाळीसगावात लोकप्रतिनिधींनी संघर्ष करून सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेसाठी प्रशस्त ग्रामीण रुग्णालय (Hospital) आणि ट्रॉमा केअर सेंटर बांधून घेतले. (Half of posts including medical officers are vacant in rural hospital due to lack of manpower affecting patient care jalgaon news)

कोविड महामारीत अनेक ठिकाणी रुग्णांना बेड मिळत नसताना येथील ग्रामीण रुग्णालयाने मंजूर ३० खाटांच्या दवाखान्यात अक्षरशः १०० रुग्णसुद्धा हाताळले आहेत. यामध्ये चाळीसगावातील सेवाभावी खासगी डॉक्टर आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मोलाचे काम केले.

परंतु कोविडनंतर जनतेने, लोकप्रतिनिधींनी आणि माध्यमांनी पाठपुरावा करूनही शासनाने आरोग्य यंत्रणेत आवश्यक मनुष्यबळ आणि सुसूत्रीकरण उपलब्ध केलेले नाही. ग्रामीण रुग्णालयात मंजूर पदांच्या अर्धीच पदे भरलेली आहेत.

या ठिकाणी चार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागेवर एकच नियमित वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे. सात अधिपरिचारिकेंच्या जागेवर चारच अधिपरिचारिका भरलेल्या आहेत, क्ष-किरण तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारीसारखी महत्त्वाची पदे रिक्त आहेत, अन्य वर्ग - ४ कर्मचारी सुद्धा भरलेले नाहीत.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

त्यामुळे या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर नेहमी अतिरिक्त ताण असतो. गर्दीच्या वेळी शालेय आरोग्य तपासणी कार्यक्रमातील कंत्राटी डॉक्टर, अधिपरिचारिका आणि औषध निर्माण अधिकाऱ्यांना मदतीसाठी सोबत घ्यावे लागते. मागील वर्षभरात ग्रामीण रुग्णालयाने दिवसाला १५० ते २०० बाह्यरुग्ण म्हणजेच एकूण २५ हजारांहून अधिक रुग्ण उपचार आणि २५०० हून अधिक सर्पदंश, विषप्राशन आणि अपघात सारख्या आंतररुग्णांवर उपचार केले आहेत.

याशिवाय २९३४ न्यायवैद्यक प्रकरणे आणि २०५ शवविच्छेदन सारखी गुंतागुंतीची प्रकरणे हाताळली आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयापैकी सर्वाधिक ८३८ प्रसूती सुखरूप केलेल्या आहेत. म्हणजेच अर्ध्याच कर्मचारी संख्येत अन्य ग्रामीण रुग्णालयांमध्ये सर्वाधिक कामकाज आहे. या नियमित उपक्रमांव्यतिरिक्त कुष्ठरोग, क्षयरोग, एचआयव्ही रुग्ण तपासणी आणि उपचार ग्रामीण रुग्णालयामार्फत दिले जातात.

ग्रामीण रुग्णालयातील यापूर्वी सुद्धा ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याबाबत विविध संघटनांनी मागणी केलेली असून, वरिष्ठ कार्यालयांनी लक्ष घालण्याची अपेक्षा आहे. नियमित रुग्ण सेवा, कोर्ट कॉल, मीटिंग आणि कॅम्प सारख्या कामकाजात, रिक्त पदांच्या आणि गर्दीच्या वातावरणात काम करणे सर्वच कर्मचाऱ्यांसाठी जिकिरीचे होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT