Hanuman in Vani Galli.  esakal
जळगाव

Hanuman Jayanti 2023 : प्रसिद्ध देवळांचे नगर नगरदेवळा; सतराव्या शतकापासूनची सर्वाधिक हनुमान मंदिरे!

सकाळ वृत्तसेवा

पाचोरा (जि. जळगाव) : देवळांचे नगर म्हणून राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या नगरदेवळा (ता. पाचोरा) गावात हनुमान मंदिरांची (Hanuman Jayanti 2023) संख्या राज्यात सर्वाधिक आहे. (hanuman jayanti 2023 Nagardeola village city of temples has highest number of Hanuman temples in state jalgaon news)

सतराव्या शतका अगोदरपासून ते १९४७ पर्यंतच्या काळातील एकूण १४ हनुमान मंदिरे नगरदेवळा गावात असून, त्यांची नित्य नेमाने मंदिर समिती व ग्रामस्थांच्या वतीने पूजाअर्चा केली जात आहे.

सतराव्या शतका अगोदर पासून ते १९४७ पर्यंतच्या या मंदिर उभारणीचा कालखंड तीन विभागात विभागला गेला आहे. त्यात १७ व्या शतका अगोदरच्या काळातील जहागीरदारांचे हनुमान मंदिर, गोंधळी गल्लीतील हनुमान मंदिर व संगमेश्वर हनुमान मंदिर या ३ मंदिरांचा समावेश आहे.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

१७०१ ते १९०० या काळातील टाकळी रोडवरील वाणी गल्लीतील हनुमान मंदिर, काटे मोहल्यातील हनुमान मंदिर, परदेशी गल्लीतील हनुमान मंदिर, बेडरपुरा हनुमान मंदिर, चुंचाळपुरा हनुमान मंदिर, ईशान्य बुरुज हनुमान मंदिर, पोस्ट ऑफिस शेजारचे हनुमान मंदिर, मुख्यदरवाजा हनुमान मंदिर अशा ८ मंदिरांचा तर १९०१ ते १९४७ या काळातील नागझिरी हनुमान मंदिर, परदेशी मोहल्ला हनुमान मंदिर व राम मंदिरातील हनुमान मंदिर या ३ मंदिरांचा समावेश आहे.

हनुमान जयंतीनिमित्त या मंदिरांमध्ये पूजा, चर्चा, अभिषेक, शेंदूर अर्पण, हनुमान चालिसा पठण, स्रोत्र व नामजप यासह विविध धार्मिक विधी होत असल्याने धार्मिकतेला उधाण आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT