Corona News esakal
जळगाव

Jalgaon News : कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कोरोनाच्या नव्या लाटेच्या प्रतिकारासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्रशासन सज्ज झाले आहे. गेल्या दोन दिवसांत छत्रपती शाहू महाराज रुग्णालयांतर्गत २०० जणांनी बुस्टर डोस घेतला. आरटीपीसीआर, रॅपिड ॲन्टिजन चाचणी सुरू करण्यात आल्या आहेत.

परदेशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पाश्‍वभूमीवर कोरोनाची नवी लाट येण्याची भीती असल्याने देशभर अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा व आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. (Health system alert for corona prevention Demand for 28 thousand vacancies Increased tendency to take booster dose Jalgaon News)

छत्रपती शाहू महाराज रुग्णालयांतर्गत कोविशिल्ड १० हजार, कोव्हॅक्सिन आठ हजार, दहा हजार कार्बोवेक्स, अशी एकूण २८ हजार लसींचा पुरवठा करण्याची मागणी रुग्णालय प्रशासनाने केली आहे. सद्यस्थिीत कोव्हॅक्सिनचे २७०० डोस जळगाव शहरात उपलब्ध आहेत.

आरटीपीसीआर, रॅपिड ॲन्टिजन चाचणी सुरू

छत्रपती शाहू महाराज रुग्णालय, आरोग्य विभागातर्फे जळगाव शहरात एक आरटीपीसीआर आणि तीन रॅपिड ॲन्टिजन, असे चार चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. आतापर्यंत आरटीपीसीआर अंतर्गत ७१ हजार ८९५ चाचण्या झाल्या असून, १२ हजार ५६५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. रॅपिड ॲन्टिजन अंतर्गत २ लाख ७२१ पैकी २४ हजार २५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. रॅपिड ॲन्टिजन, तसेच आरटीपीसीआर अंतर्गत एकूण २ लाख ७२ हजार ६१६ चाचण्या झाल्या आहेत.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

शहरात ८४.४१ टक्के लसीकरण

जळगाव शहरात १२ ते १४ वयोगटात १५ हजार ८७९ पात्र बालक असून, १० हजार ९३३ (६८.८५ टक्के) जणांना पहिला, तर ५ हजार ९३३ (३७.३३ टक्के) बालकांना दुसऱ्या टप्प्यात लसीकरण करण्यात आले आहे. १५ ते १८ वयोगटात २४ हजार ५६५ किशोरवयीन लाभार्थी असून, २४ हजार ५८० (९९.८५ टक्के) जणांना, तर १७ हजार ८३३ (६६.९७ टक्के) दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण झाले आहे.

१८ वर्षे व त्यावरील वयोगटात तीन लाख ७० हजार ६४० लसीकरण पात्र लोकसंख्या आहे. यात तीन लाख ६८ हजार ८४८ (९९.५२ टक्के) पहिल्या टप्प्यातील लसीकरण झाले असून, ५५ हजार ९८१ नागरिकांना दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण करणे बाकी आहे. तीन लाख १२ हजार ८६७ (८४.४१ टक्के) नागरिकांना दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण झाले आहे.

५० हजार लसी येणार

जिल्हा रुग्णालयात कोविड केअर सेंटरमध्ये ९६७, विलगीकरण कक्षात २,३७६, डीसीएचसीत ३,६५३, डीसीएचमध्ये १,११०, आययसीयू युनिट, अशी बेडची सुसज्जता करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयास जिल्हा परिषद पातळीवरून कोविड प्रतिबंधात्मक लसीचा पुरवठा केला जातो. त्यानुसार ५० हजार लसी जिल्हा रुग्णालयात उपलब्ध होणार आहेत.

आकडे बोलतात...

असा होता कोरोना काळ

आरटीपीसीआर चाचण्या : ६ लाख ४४ हजार ३६२

ॲन्टिजन टेस्ट : ११ लाख ४१ हजार ८६०

एकूण तपासण्या : १७ लाख ८६ हजार २२२

निगेटिव्ह अहवाल : १६ लाख ३२ हजार २१

पॉझिटिव्ह रुग्ण : १ लाख ५२ हजार ९७

अन्य आजाराचे रुग्ण : २,१०४

कोरोनामुक्त रुग्ण : १ लाख ४९ हजार ५०५

शेवटचा रुग्णमुक्त : २४ एप्रिल २०२२ (जिल्हा कोरोनामुक्त घोषित)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogendra Yadav: हरियानाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काय होणार? योगेंद्र यादव यांनी केलं भाकीत

Farmers Protest: दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन; उपोषणाची घोषणा! दिल्लीच्या दिशेने ट्रॅक्टर्स होणार रवाना

पाकिस्तान क्रिकेटची 'सर्कस'! Champions Trophy 2025 साठी निवडला नवा प्रभारी कोच; जेसन गिलेस्पी आता फक्त...

Winter Kitchen Cleaning Tips: किचन हे आरोग्याचे अन् रोगाचे माहेरघर! हिवाळ्यात अशा प्रकारे स्वयंपाकघराची ठेवा स्वच्छता

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT