Heavy rain forecast for next 4 days from today in jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon Rain Alert : जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा जिल्हा प्रशासनाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Rain Alert : जिल्ह्यात आजपासून पुढील चार दिवस अतिवृष्टी होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

कोणत्याही ठिकाणी अतिवृष्टी होऊन नदी-नाल्यांना पूर येऊ शकतो. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना, शेतकऱ्यांनी शेतात जाताना सतर्कता बाळगावी, अशा इशारा जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिला आहे.

जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने धरणाच्या साठ्यात वाढ होत आहे. धरण परिसरात अतिवृष्टी होत असल्यास धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येईल. (Heavy rain forecast for next 4 days from today in jalgaon news)

त्यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षातर्फे नदीकाठच्या सर्व नागरिकांना आवाहन व सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

या आहेत सूचना...

-पूर पाहताना सेल्फी काढू नका

-सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी, तसेच नदीकाठच्या नागरिकांनी नदीच्या पातळीत वाढ झाल्यास तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे

- नाले, ओढे, नदीकाठच्या नागरिकांनी दक्ष राहावे

- पाणीपातळीत वाढ होत असल्यास नदीपात्रापासून दूर जावे

- पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्यास पूल ओलांडू नये

- पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये

- जुनाट/मोडकळीस आलेल्या व धोकेदायक इमारतींमध्ये आश्रय घेऊ नये

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

- पूरग्रस्त भागातून वाहने चालवू नये

- जमिनीखालून जाणाऱ्या वीज तारांपासून सावध राहावे

- पुराच्या पाण्याच्या संपर्कात आलेले अन्नपदार्थ खाऊ नये

- नदीच्या प्रवाहात उतरू नये

- पिण्याचे पाणी उकळून प्यावे

- जेवणाआधी हात स्वच्छ धुवून घ्यावेत

- घाट, डोंगर रस्ते, अरुंद रस्ते, दरी-खोरे येथून प्रवास करणे टाळावे

- धरण, नदी, धबधबे, डोंगरमाथा, घाट कपारी, जंगल रस्ते येथे पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घावी. धोकादायक ठिकाणी चढू अथवा उतरू नये. आपत्कालीन परिस्थितीत खालील नियंत्रण कक्षास संपर्क करावा.

जिल्हा नियंत्रण कक्ष- टोल फ्री १०७७, ०२५७-२२१७१९३/२२२३१८०

पोलिस मुख्यालय नियंत्रण- टोल फ्री १००, ०२५७-२२२३३३३/२२३५२३२

जळगाव महापालिका नियंत्रण कक्ष- टोल फ्री १०१, १०२/०२५७-२२३७६६६, ९६२३३५०४६४/०२५७-२२२४४४४/९०२१६३३०२२

जिल्हा सामान्य रुग्णालय-रुग्णवाहिका टोल फ्री १०८, ०२५७-२२२६६११

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Amit Thackeray: अमित ठाकरेंसाठी सुरक्षित मतदारसंघ शोधला; पण मुंबईतला नाही तर...

Jarange Health Update: उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांनी केल्या कडक शब्दांत सूचना

Latest Marathi News Updates : भाजपशासित सर्व राज्यांमध्ये प्रसादाची तपासणी करावी: मंत्री प्रियांक खर्गे

IND vs BAN: अ‍ॅक्शन रिप्ले! Rohit Sharma दुसऱ्या डावातही फसला; एकाच पद्धतीने पुन्हा OUT झाला, जैस्वालही गंडला

Share Market Closing: आठवड्याच्या शेवटी शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्सने 1400 अंकांनी वाढला, निफ्टी 25,800च्या वर

SCROLL FOR NEXT